आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ एप्रिल २०२० सकाळी ११.००
वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठीच्या पुढच्या धोरणांसह येत्या तीन मे नंतर टाळेबंदी टप्प्या टप्प्यानं कशी मागे घेता
येईल, याबाबत यात चर्चा सुरू आहे. पंतप्रधान
या विषाणूच्या प्रादूर्भावानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर
चौथ्यांदा संवाद साधत आहेत.
****
देशातील कोरोना विषाणू
बाधीतांची संख्या २७ हजार ८९२ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली
आहे. यातील सहा हजार एकशे अठरा रुग्ण बरे झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या
८७२ आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक ८०६८ रुग्ण आढळले असून मृत्यूमुखी पडलेल्यांची
संख्याही सर्वाधिक
३४२
आहे.
****
उस्मानाबाद
इथं महात्मा बसवेश्वर जयंती ऊत्सव समितीकडून जयंतीनिमित्त होणाऱ्या खर्चाचा निधी कोरोना
विषाणू संसर्गाच्या प्रतिबंध आणि उपचारांसाठी देण्यात आला आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी
११ हजार १११ रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला आहे. या समितीतर्फे अन्नपुर्ण
बहद्देशीय संस्थेला ३० किलो धान्य तसंच गोरगरिबांना आणि कुष्ठधाम आश्रम इथं अन्न वाटप
करण्याऱ्या अनिरुद्ध जोशी यांना ३० किलो धान्य देण्यात आलं. उस्मानाबाद महात्मा बसवेश्र्वर
जयंती उत्सव समितीतर्फे भाजी विक्रेत्यांना सॉनिटायजर आणि मास्कचं वाटपही करण्यात आलं
आहे.
****
यवतमाळ इथं कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची संख्या ६१ झाली आहे. काल रात्री पाच आणि आज सकाळी सहा जणांना या विषाणूची
लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
नांदेड शहराला पाणीपुरवठा
करणाऱ्या शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयात पाणीसाठा कमी झाल्यामुळे परभणी जिल्ह्यातील
डिग्रस ऊच्चपातळी बंधाऱ्यातून आज सकाळी २५ दश लक्ष घन मीटर पाणी सोडण्यात आलं आहे.
हे पाणी दुपारी बारा वाजे पर्यंत नांदेडच्या विष्णुपूरी जलाशयात पोहचणार असलेल्याची
माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे यांनी दिली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment