Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****
**
चार मे
पासून देशातल्या काही जिल्ह्यांना टाळेबंदीतून सूट दिली जाणार- केंद्रीय गृह मंत्रालय
** विविध भागात
अडकलेले स्थलांतरीत मजूर, पर्यटक,
विद्यार्थी आणि इतरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी सशर्त परवानगी
** कोरोना
विषाणूग्रस्तावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी झाल्याचा आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांचा दावा
** राज्यात
आणखी ५९७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण; ३२ जणांचा मृत्यू
** औरंगाबाद शहरात २१, उदगीरमध्ये चार, हिंगोलीत दोन तर
जालना आणि परभणीत प्रत्येकी एक रूग्ण
** विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची मुख्यमंत्र्यांची
पंतप्रधानांना विनंती
**आणि
** प्रसिद्ध
अभिनेते इरफान खान यांचं निधन
****
केंद्र सरकार टाळेबंदीसंदर्भात चार मे पासून
नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करणार असून, काही
जिल्ह्यांना टाळेबंदीतून सूट दिली जाणार आहे. गृह
मंत्रालयानं काल टाळेबंदीच्या स्थितीसंदर्भात व्यापक आढावा बैठक
घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. याबाबत सविस्तर सूचना येत्या एक दोन दिवसात जारी केल्या जाणार
आहेत. टाळेबंदीमुळे परिस्थिती नियंत्रणात
आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. तीन मे पर्यंत सर्वत्र टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली
जावी, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
टाळेबंदीमुळे
देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरीत
मजूर, पर्यटक,
विद्यार्थी आणि इतरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी काही अटींवर केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. अडकलेल्या
लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवताना बसेसचा वापर करावा, तत्पूर्वी या बसेसचं
निर्जतुंकीकरण करून घ्यावं तसंच प्रवासादरम्यान एकमेकांपासून अंतर राखण्याच्या नियमाचं
पालन करावं अशा अटींवर ही सशर्त परवानगी देण्यात येत असल्याचं गृह मंत्रालयानं काल
जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी
राज्यांनी अगोदर एक नोडल प्राधिकारी नियुक्त करावा आणि त्यानंतर त्या प्राधिकाऱ्यामार्फत
या लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची आणि बाहेरच्या राज्यात अडकलेल्या आपल्या राज्यातल्या
लोकांना आणण्याची व्यवस्था करावी, असं गृहमंत्रालयाच्या या आदेशात म्हटलं आहे. दोन्ही
राज्यांनी एकमेकांशी चर्चा करून या लोकांच्या प्रवासासंबधीचा तपशील निश्चित करावा.
अडकलेले लोकं जिथं असतील तिथं
त्यांची वैद्यकीय तपासणी करून मगच त्यांना पाठवावं, आणि
ते त्यांच्या गावी पोचल्यानंतर केंद्र सरकारच्या दिशा निर्देशांनुसार त्यांना घरी
किंवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवावं, असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.
दरम्यान, राज्यात अडकलेल्या स्थलांतरित
मजूरांना नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांच्या गावी पाठवण्यासाठी राज्य सरकार इतर
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहे, असं
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं
वार्ताहरांशी बोलत होते. ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या
मजुरांना परत पाठवण्याबाबतचा निर्णय जाहीर करतील, असं
त्यांनी सांगितलं
****
केंद्र सरकारनं बड्या
थकबाकीदारांपैकी कोणाचंही कर्ज माफ केलेलं नसून, कर्ज
बुडव्यांविरोधात कारवाई केली जात असल्याचं, माहिती
आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. वसूल
न झालेल्या कर्जाच्या रकमा एका ठराविक कालमर्यादेनंतर बँकांकडून ताळेबंदातून निर्लेखित
केल्या जातात. मात्र याचा अर्थ ते कर्ज माफ केलं असा होत नाही, असं
जावडेकर यांनी म्हटलं आहे. नीरव मोदी तसंच विजय मल्ल्या यांच्याविरोधात कारवाई सुरू
आहे. त्यांच्या थकबाकीचा एक मोठा हिस्सा वसूल झालेला आहे, आणि
उर्वरित रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणूग्रस्तावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा पहिला
प्रयोग यशस्वी झाला असल्याचं, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या
लीलावती रुग्णालयात ही चाचणी करण्यात आली असून, आता
दुसऱ्या रुग्णावर पुन्हा प्लाझ्मा थेरपीने उपचार केले जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या
उपचार पद्धतीत कोरोना विषाणूमुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाझ्मा हा घटक घेऊन, तो
कोरोना विषाणू बाधिताच्या रक्तात सोडला जातो, असं
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र ही पद्धत कोरोना विषाणू ग्रस्तावर
उपचारासाठी वापरावी, याचा अद्यापतरी काहीही ठोस पुरावा नसल्याचं, केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात काल आणखी ५९७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं
एकूण रुग्णांचा आकडा नऊ हजार ९१५ झाला आहे. काल
या आजारानं राज्यात ३२ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत
मृत्यू झालेल्यांची संख्या ४३२ इतकी आहे.
****
औरंगाबाद शहरात काल दिवसभरात २१ नवीन कोरोना विषाणू बाधित
रुग्ण आढळले असून, एकूण रुग्ण संख्या १३० वर पोहोचली आहे. जिल्हा
सामान्य रुग्णालयात ९१, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत
१० बाधितांवर उपचार सुरु आहे. औरंगाबादमध्ये आतापर्यंत सात जणांचा या आजारानं मृत्यू
झाला, तर २३ जण बरे होऊन घरी परतले आहेत.
शहरातल्या बायजीपुरा इथल्या कोरोना विषाणू बाधित महिलेची
काही दिवसांपूर्वी प्रसुती झाली होती, या महिलेला तसंच तिच्या बाळाला काल
घरी सोडण्यात आलं. शहरात आतापर्यंत एकूण २४ रूग्णांना उपचार करून घरी सोडण्यात
आलं असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं.
दरम्यान, नशेच्या गोळ्या विक्री प्रकरणी शहरातल्या
सिटीचौक पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपीचाही कोरोना विषाणू बाधितांमध्ये समावेश
आहे. त्यामुळे या पोलिस ठाण्यातल्या २० कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात
ठेवण्यात आलं असून, या सर्वांच्या लाळेच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येत
असल्याचं पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातला ग्रामीण भाग पुढचे दोन दिवस पूर्णपणे
बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिले आहेत. आज
आणि उद्या एक मे या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता कडक टाळेबंदीची
अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचा
इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी कोरोना विषाणूचा
संसर्ग वाढू नये यासाठी रस्त्यावर न येता, पोलिसांना
सहकार्य करण्याचं आवाहन पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथल्या छावणी परिसरात एका
बेकरीतल्या कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं वृत्त निराधार आहे. याबाबत
सामाजिक संपर्क माध्यमावरून चुकीची बातमी फिरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. छावणी
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी याबाबत एक पत्र जारी करून, हे
वृत्त निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं काल चार जण कोरोना विषाणू
बाधित आढळून आले. हे चौघे जण मृत्यू झालेल्या कोरोना विषाणू बाधित महिलेच्या
संपर्कातले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या सात
झाली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी दोन नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी
एक विशेष राखीव पोलिस दलाचा सैनिक असून, दुसरा रुग्ण बार्शी इथून आलेला आणि वसमत इथं विलगीकरण कक्षात असलेला २१ वर्षीय
तरुण आहे. काल सकाळी या दोघांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे
आता जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या सोळा
झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं तीन
मे पर्यंत जिल्ह्यातली सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संचारबंदीची
कठोर अंमलबजावणी करण्याबाबत तसचं घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं
प्रशासनानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या पारध इथल्या
एका सतरा वर्षीय मुलीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे
जालना जिल्ह्यात बाधितांची संख्या तीन झाली आहे. बाधित
तरुणी दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या तरुणीच्या लाळेचे नमुने
प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले होते. ही मुलगी गुजरात राज्यातल्या सुरतहून आपल्या नातेवाईकांसह पारधला पोहचली
होती, मात्र ग्रामस्थांनी त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवलं होतं.
दरम्यान
जिल्हा रुग्णालयात १६ दिवस उपचार घेतल्यानंतर, परतूर
तालुक्यातल्या शिरोडा इथल्या महिलेला काल कोरोना विषाणूमुक्त
झाल्यावर सुट्टी देण्यात आली. विलगीकरण कक्षातून बाहेर आल्यानंतर डॉक्टर, परिचारिकांनी
या महिलेचं टाळ्या वाजवून आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. योग्य उपचार तसंच
डॉक्टर, परिचारिकांनी धीर दिल्यानं आपण ही लढाई जिंकल्याची भावना या
महिलेनं व्यक्त केली.
दरम्यान, दु:खीनगर भागातल्या कोरोना विषाणू मुक्त
झालेल्या महिलेला रुग्णालयातून घरी पाठवण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असं
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलूच्या इथल्या
५५ वर्षीय महिला नांदेड इथं उपचारादरम्यान कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं काल
स्पष्ट झालं. सदर महिला गंभीर आजारानं ग्रस्त असल्यानं सुरवातीला
उपचारासाठी औरंगाबादला आली होती, त्यानंतर २६ एप्रिल रोजी सेलूत येऊन दोन दिवस कुटुंबियांसोबत
राहून, ती पुन्हा उपचारासाठी नांदेडला गेली होती. नांदेड
इथं उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणू तपासणी केली असता, ती बाधित असल्याचं आढळून आलं. परभणी जिल्हा प्रशासनानं सेलुत आरोग्य पथकं पाठवली असून, संचारबंदी
लागू केली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं मोठ्या प्रमाणात
रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यात कोरोना विषाणू बधितांची संख्या २४९ झाली आहे. केवळ
मालेगाव इथल्या बधितांची संख्या २२६ इतकी आहे. काल
नाशिक शहरात एक रुग्ण वाढल्यानं शहरातल्या बधितांची एकूण संख्या ११ झाली आहे. तर
येवला इथं एक जण बाधित असल्याचं आढळलं आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर
उपचारासाठी सरकारनं रुग्णालयांची त्रिस्तरीय व्यवस्था केली आहे. सौम्य, मध्यमस्तरीय आणि गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी
ही व्यवस्था असणार असल्याची माहिती आरोग्य सेवा आयुक्त डॉ. अनुप
कुमार यादव यांनी दिली आहे. ते म्हणाले…
पूर्ण राज्यामध्ये त्रिस्तरीय व्यवस्था
कोविड १९ च्या treatment सा ठी तयार करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जवळपास ९०० care centre आहेत. जवळपास ५०० category
२ चे तिथे moderate centre कोविड १९
patient ठिक केले जाणार आहेत. २३० हॉस्पिटल
आहेत तिथे critical patient आहे त्यांना स्वत आपण घेऊन जाणे अपेक्षित आहेत आणि महत्त्वाच्या
असं आहे की प्रत्येक ठिकाणी clinic स्थापन करण्यात आलेल्या आहे.
****
केंद्र सरकारच्या सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू ॲप तत्काळ डाऊनलोड करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या ॲपद्वारे आपण सुरक्षित
असल्याचं सांगितल्यावरच त्यांनी
कार्यालयात यावं, अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे. मात्र
या ॲपने जर मध्यम किंवा अति धोका असल्याचे संकेत दिले, तर संबंधितांनी कार्यालयात न येता, पुढचे
चौदा दिवस घरीच विलगीकरणात राहावं, असं
या बातमीत म्हटलं आहे.
****
विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काल दूरध्वनीवरून बोलतांना केली असल्याचं वृत्त
प्रेस ट्रस्ट या वृत्तसंस्थेनं सूत्राचा हवाला देऊन दिलं आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं ठाकरे यांनी पंतप्रधानांना
सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. कोविड १९ विषाणूच्या संकटाच्या काळात महाराष्ट्रासारख्या
मोठ्या राज्यात राजकीय अस्थिरता योग्य नाही, यात आपण लक्ष घालावं, असं ठाकरे यांनी
मोदी यांना सांगितलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासंदर्भात मंगळवारी राज्यपाल
भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे काल पंतप्रधानांशी याविषयावर दूरध्वनीवर
बोलले. उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याचा ठराव राज्य
मंत्रिमंडळानं दोन वेळा पारित केला आहे, मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप
त्याला मंजुरी दिलेली नाही.
दरम्यान, राज्यातल्या कोरोना विषाणू संबंधी परिस्थितीवरही
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात चर्चा झाली. राज्य
सरकार करत असलेल्या उपाययोजनांची पंतप्रधानांनी माहिती घेतली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्यातल्या तीनही वीज कंपन्या आणि वीज नियामक आयोगामध्ये समन्वय साधून वीज दर कमी करायच्या निर्णयामुळे राज्यात उद्योग आणि
व्यवसाय वाढीसाठी मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
यांनी व्यक्त केला आहे. ते काल झूम ऍपच्या माध्यमातून घेतलेल्या वार्ताहर परिषदेत
बोलत होते. ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्विकारल्यापासून सध्याच्या कोरोना विषाणू
संकट काळात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती राऊत यांनी यावेळी दिली.
राज्यातला वीज दर सरासरी ७ टक्के कमी केला
असल्याचं त्यांनी सांगितलं. औद्योगिक
तसंच व्यावसायिक ग्राहकांवर पुढचे तीन
महिने स्थिर आकार लागू होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. घरगुती वापराच्या
बिलांचे मीटर रिडींग घेणार नसून गेल्या महिन्याच्या सरासरी बिलावरून वीज देयक तयार
केलं जाईल असं राऊत यांनी सांगितलं.
****
गावी परतलेल्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड
मजुरांना २८ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येत असून, त्यांना
जीवनावश्यक किराणा साहित्याचं मोफत वाटप करण्याचा निर्णय पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी
घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून त्यांना ही मदत दिली जाणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून प्राथमिक स्वरूपात
एक कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामविकास
विभागानं यास विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यताही दिली आहे.
****
महाराष्ट्र दिन उद्या साजरा होणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
यंदा महाराष्ट्र दिनानिमित्त कोणतेही कार्यक्रम होणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री,
जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक अशा निवडक अधिकार्यांच्या उपस्थितीतच ध्वजारोहण होणार
असल्याचं शासनानं यापूर्वीच सांगितलं आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या उदगीर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन
प्रयत्न करत असून, या परिस्थितीत सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, कोणत्याही
अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केलं आहे. विलगीकरण
कक्षात ठेवलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, यावेळी
नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचं बनसोडे यांनी सांगितलं.
****
राज्य शासन तीन मे नंतर टाळेबंदीचा कालावधी वाढवणार
असेल तर इतर जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी, शिक्षकांबाबत
शासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार
सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पुणे, औरंगाबाद
सारख्या शहरात ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी तसंच राज्यातल्या विविध जिल्हा
परिषदांमध्ये हजारो शिक्षक स्वत:च्या मूळ जिल्ह्यांपासून शेकडो किलोमीटर अंतरावर अडकून
पडले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर नगर परिषदेच्यावतीनं शहरातल्या
१०४ दिव्यांग व्यक्तींच्या बँक
खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा
करण्यात आले तर बँक खाते नसलेल्या ७० लाभार्थींना प्रत्येकी
२००० रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. टाळेबंदीच्या पार्श्र्वभूमीवर
राज्य शासनानं त्यांना आर्थिक अनुदान देण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार हे अनुदान देण्यात आलं आहे.
****
टाळेबंदीच्या काळात परभणी जिल्ह्यातील
कुठलाही नागरीक उपाशी राहू नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं विविध उपाय
योजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात एक हजार ६३ स्वस्त धान्य दुकानातून
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्न धान्याचं वितरण
करण्यात येत असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती सुर्यवंशी यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या..
आपल्या जिल्ह्यामध्ये पाच हजार दोनशे
आतापर्यंत वाटप झालेले आहे येथील प्रमाण ८४
टक्के एवढा आहे मे व जून महिनांमध्ये धान्याचे वाटप एपीएस केसरी पत्रिका शिला धारकांना
सुरू झालेले आहे १७००
मेट्रिक टन धान्याचे वाटप होणार आहे तक्रारीच्या अनुषंगाने दोन दुकानांवर कारवाई करण्यात आलेली असून पाथरी तालुक्यातील एक दुकान निलंबित करण्यात आलेले असून सेलू तालुक्यातील एका दुकानाची अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये शिवभोजनाची अकरा केंद्र असून आपण पंधराशे थाळी दररोज वाटप करीत आहोत उज्वला योजना २९ हजार लाभार्थ्यांना त्यांना मोफत सिलेंडर पोहोचलेले असून एकूण लाभार्थ्यांची संख्या एक लाख पाच हजार एवढी आहे
मेट्रिक टन धान्याचे वाटप होणार आहे तक्रारीच्या अनुषंगाने दोन दुकानांवर कारवाई करण्यात आलेली असून पाथरी तालुक्यातील एक दुकान निलंबित करण्यात आलेले असून सेलू तालुक्यातील एका दुकानाची अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये शिवभोजनाची अकरा केंद्र असून आपण पंधराशे थाळी दररोज वाटप करीत आहोत उज्वला योजना २९ हजार लाभार्थ्यांना त्यांना मोफत सिलेंडर पोहोचलेले असून एकूण लाभार्थ्यांची संख्या एक लाख पाच हजार एवढी आहे
****
लातूर जिल्ह्यात नाम फांऊडेशनच्या वतीनं सहाशे गरजुंना किराणा सामानाच्या
सहाशे पाकिटांचं वाटप करण्यात आलं.
नाम फांऊडेशनचे प्रमुख नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, राजाभाऊ
शेळके, यांच्या माध्यमातून या साहित्याची व्यवस्था करण्यात आली. परभणी
जिल्ह्यात मानवत शहरातल्या हमालवाडी परिसरातही नाम फाउंडेशन आणि ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या
वतीनं १२० कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आलं.
पाथरी तालुक्यातल्या वडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत विलगीकरणात
ठेवण्यात आलेल्या ऊसतोड मजूरांना स्वर्गीय नितीन महाविद्यालय आणि जन्मभूमी फाऊंडेशनच्या
वतीनं १४ दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूंचा साठा वाटप करण्यात आला.
****
परभणी शहरातल्या डॉक्टरांसाठी केंद्रीय अन्न आणि नागरी
पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्यांनी ५० पीपीई किट्स आणि पंधराशे मास्क उपलब्ध
करून दिले. परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्याहस्ते परभणी
आय एम एच्या डॉक्टर्सकडे या वस्तु सुपूर्द करण्यात आल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम-परंडा-वाशीचे
शिवसेना आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वतीनं गरजूंसाठी २५ हजार जीवनावश्यक वस्तुंच्या संचाचं वाटप करण्यात आलं.
उस्मानाबाद शहरातल्या साईराज मित्र परिवाराच्या वतीनं
काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं. ५० जणांनी यावेळी रक्तदान केलं.
****
हिंगोली इथल्या ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह
बँकेच्या वतीनं पंतप्रधान सहाय्य्ता निधीला आणि मुख्यमंत्री
सहाय्यता निधीला प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात
आली आहे. या रकमेचा धनादेश अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, निवासी
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे काल सुपूर्द करण्यात आला.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद
उपकेंद्र मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉक्टर अशोक
मोहेकर यांनी पत्नीसह स्वतःचंही एक महिन्याचं निवृत्तीवेतन मुख्यमंत्री सहायता निधीस
दिलं आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगरच्या श्री
परमेश्वर मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महावीर श्रीश्रीमाळ यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश काल जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे
सुपुर्द केला.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात विलगीकरणात ठेवलेल्या
१०३ मजुरांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आलं. बेकायदेशीररित्या
पायी तसंच इतर वाहनांतून घराकडे निघालेल्या या मजुरांना प्रशासनानं ताब्यात घेतलं होतं.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ
शहरातल्या जिल्हा बँकेच्या शाखेसमोर ग्राहकांनी काल मोठी गर्दी करून सर्व नियमांची
पायमल्ली केल्याचं दिसून आलं.
****
नांदेड शहरातल्या फार्मा टेडर्स या दुकानामधून निर्धारीत
किंमतीपेक्षा जास्त दरानं सॅनिटायझरची विक्री करत असल्याचं आढळून
आल्यानं दुकानदाराविरूध्द अत्यावश्यक वस्तु अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. या दुकानात सॅनिटायझरचा अधिक
साठा असल्याचं आढळून
आलं आहे.
****
परभणीत प्रतिबंधात्मक उपापयोजनेचं पालन न करणाऱ्या ८०
जणांविरूद्ध दंडात्मक कारवाई
करून १४
हजार ३०० रुपयांचा दंड महापालिकेनं
वसूल केला आहे. सार्वजनिक
ठिकाणी थुंकणं, मास्क न लावणं, दुकानावर, भाजीपाला
विक्री ठिकाणी एकमेकांमध्ये ठरविक अंतर न राखणं, किराणा, जिवनावश्यक
वस्तु विक्रेत्यानं मुख्य वस्तुंचे दरपत्रक न लावणं आदी प्रकरणी ही कारवाई करण्यात
आली.
****
हिंदी आणि इंग्रजी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा वेगळा
ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं काल
सकाळी मुंबईत निधन झालं, ते ५४ वर्षांचे होते. दूरदर्शनवरील
विविध मालिकांसह अनेक हिंदी- इंग्रजी चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारलेले इरफान
खान यांना, पद्मश्री या नागरी सन्मानासह, पानसिंग
तोमर या चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. २०१८
साली कर्करोगावर उपचारासाठी ते विदेशात गेले होते, उपचारानंतर
भारतात परतल्यावर प्रदर्शित झालेला इंग्रजी मीडियम हा त्यांचा अखेरचा चित्रपट
ठरला. प्रकृती बिघडल्यानं, त्यांना
मुंबईत कोकिळाबेन धिरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, उपचारादरम्यान
त्यांचं काल निधन झालं.
इरफान खान यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान
नरेंद्र मोदी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त
केलं आहे.
****
टाळेबंदीच्या
काळातही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २१ ते २८ एप्रिल दरम्यान २८ कोटी ६६ लाख रूपयांचा
शेती माल विक्री करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शेत माल बाजार समितीमध्ये आणण्यासाठी
प्रभावी यंत्रणा बाजार समितीच्या वतीनं राबवण्यात आली.याविषयी अधिक माहिती देत आहेत
आमचे वार्ताहर…
बाजार
समितीनं नियम पाळणे शेतकऱ्यांना माल बाजार समितीत आणण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा राबवली
आणि शेतकऱ्याला एकाच वेळी एक वाहन सोडणं त्याची नोंदणी करणं सकाळी पाच ते दहा वेळेस
परवानगी घेणे या सगळ्या प्रकार केल्यामुळे बाजार समितीचे आवारात हरभरा, सोयाबीन, गहू,
ज्वारी ,बाजरी, उडीद मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची माहिती बाजार समितीचे
सभापती ललित कुमार शहा यांनी आकाशवाणीला दिली अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर
****
भारतीय कापूस
महामंडळामार्फत कापूस खरेदीसाठी परभणी जिल्ह्यात आतापर्यंत
४६ हजार ७७६ कापूस उत्पादकाची नोंदणी केली आहे.
****
पालघर जिल्ह्यात जमावानं तीनजणांची हत्या केल्याप्रकरणी
पोलीस अधिक्षकांनी काल आणखी तीन जणांना निलंबित केलं. त्यात एक सहायक पोलीस उप
निरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबल्सचा समावेश असून, त्यांची विभागीय चौकशी
केल्यानंतर ही कारवाई केली आहे.
****
No comments:
Post a Comment