आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ एप्रिल २०२० सकाळी ११.००
वाजता
****
औरंगाबाद शहरात आज
आणखी ११ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
यामध्ये नऊ रुग्ण नूर कॉलनीतले तर गारखेडा आणि भीमनगर इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा
समावेश आहे.
दरम्यान,
किले अर्क परिसरात अगोदरच मरण पावलेल्या एका ७० वर्षी महिलेच्या
मृत्यूनंतरच्या अहवालात ती कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं.
यामुळे औरंगाबादमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सात
झाली आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता
प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद शहरात आजपासून सकाळी ११ ते रात्री ११ या वेळेत संचारबंदी
लागू राहणार असल्याचं, जिल्हाधिकारी
उदय चौधरी यांनी सांगितलं आहे. या काळात औषधी दुकानं, वैद्यकीय आस्थापना वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. फळ विक्रेत्यांना देण्यात आलेली सूटही रद्द करण्यात
आली आहे. कोरोना विषाणू बाधित जास्त
रुग्ण आढळलेल्या नऊ भागात आजपासून ते तीन मे पर्यंत बँकांचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. अन्य
भागातल्या बँका सकाळी नऊ ते ११ वाजेपर्यंत दोन तासच
सुरु राहणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या
हिमायतनगर तालुक्यातल्या आंदेगाव इथं रात्री साडेबारा च्या सुमारास आग लागली. या आगीत तीन
घरं, तसंच चार गोठे खाक झाले असल्याची, प्राथमिक माहिती मिळाली आहे. संसारोपयोगी साहित्य, शेतमाल, रोख रक्कम, जनावराचा चाऱ्याचं
या आगीत मोठं नुकसान झालं आहे. आगीचं नेमकं कारण
समजलं नसून भोकर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अडीच तासानंतर आगीवर
नियंत्रण मिळवलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातल्या आकुर्डी गावात एक कोरोना विषाणुबाधित रुग्ण सापडला आहे. आज सकाळी या 45 वर्षाच्या पुरुषाचा चाचणी
अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे
जिल्ह्यातील कोरोना विषाणुबाधित रुग्णांची
संख्या आता तेरा झाली आहे.
सिंधुदुर्गात मुंबईहून
आलेल्या १५ वर्षीय मुलीला कोरोना विषाणू बाधा झाली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment