Friday, 9 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. एका घरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी या परिसराला घराव घातला, या चकमकीत सुरक्षा बलाचे चार जवान जखमी झाले.

****

या महिन्यात ११ ते १४ तारखेदरम्यान व्यापक सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्याचं, आणि याला उत्सवाच्या रुपात साजरा करण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. मास्क वापरण्याचं महत्व, आणि कोविड नियमांचं पालन करण्यासंदर्भात जनजागृती आवश्यक असल्याचं, पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.

****

केंद्र सरकारनं पाठवलेल्या उच्चस्तरीय पथकांनी काल राज्यांच्या अनेक जिल्ह्यांचा दौरा करुन, कोविड साथीमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेतला. राज्याचा आरोग्य विभाग आणि जिल्हास्तरावरच्या स्थानिक अधिकाऱ्यांना कोविड साथीवर देखरेख, नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय योजण्याच्या कामात मदत करण्यासाठी, ही केंद्रीय पथकं पाठवण्यात आली आहेत.

****

नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील खानापूर ईथले कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायणराव ताडकोले यांच काल अल्पशा आजाराने निधन झालं, ते ६६ वर्षांचे होते. ताडकोले हे देगलुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, तसंच खानापूरचे सरपंच होते.

****

नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या कलदगाव इथं आरोग्य विभागाच्या वतीनं अँटीजेन कोविड तपासणी शिबीर घेण्यात आलं, या शिबीरात गावातल्या १२० लोकांची तपासणी करण्यात आली.

****

सामाजिक संपर्क माध्यमातून अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणीला अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं मुंबईत अटक केली. इकरा कुरैशी असं या तरूणीचं नाव असून, तिला डोंगरी परिसरातून अटक करण्यात आली. तिच्याकडून दीड लाख रुपयांची रोकड आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या सहा हजार ६०८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८४ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...