Monday, 12 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१२ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

गेल्या २४ तासांत देशात एक लाख ६८ हजार ९१२ नव्या कोविड रूग्णांची नोंद झाली. तर ९०४ रूग्णांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासात देशात ७५ हजारांहून अधिक रूग्ण या संसर्गातून मुक्त झाले.

दरम्यान, कोरोनाविरुद्धचा लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण उत्सवाला काल प्रारंभ झाला. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंती दिनी सुरू झालेला हा देशव्यापी लसीकरण उत्सव येत्या १४ एप्रिलपर्यंत म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत राबवला जाईल. लसीकरण उत्सवाअंतर्गत काल एका दिवसात २९ लाख ६९ हजार लसीच्या मात्रा देण्यात आल्या. यामध्ये सुमारे २५ लाख ४७ हजार जणांना पहिली, तर दोन लाख २२ हजार जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. देशात आतापर्यंत १० कोटी ४५ लाख मात्रा देण्यात आल्या असून त्यापैकी सुमारे नऊ कोटी नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

****

नाशिक शहरात रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने रुग्णांचे नातेवाईक त्रस्त असतानाच काल रात्री नाशिक पोलिसांनी हे इंजेक्शन २५ हजार रुपयांना काळाबाजारात विकताना एका डॉक्टरला ताब्यात घेतलं. डॉ.रवींद्र श्रीधर मूळक असं त्याचं नाव असून त्याने एका रुग्णाच्या नातेवाईकांना २५ हजार रुपयांना एक इंजेक्शन देण्याची तयारी दर्शवली मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली. त्यामुळे पंचवटीतील अमृतधाम या परिसरात रात्री उशिरा या डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडे तीन इंजेक्शन्स आढळल्याचे पोलिसांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल १४३५ जणांना कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाल्यानं सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८१३३० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल एकूण १२८० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९८६९२ झाली आहे. आजपर्यंत एकूण १९८१ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १५३८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

सोमवती अमावास्येच्या मुहूर्तावर हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात गंगानदीमध्ये स्नान करण्यासाठी आज भाविकांची गर्दी झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमावली लागू करण्यात आली असून पूर्वनोंदणी केलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. कुंभमेळ्यात शाही स्नान असलेल्या मुहूर्तावर म्हणजे आजबरोबरच १४ आणि २७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत दूरदर्शन आणि यू ट्यूब वर कुंभमेळ्याचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. 

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 03 جولائی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 03 July 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...