Sunday, 5 February 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०५ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

दुसरं घर खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतच सवलत देण्याचा प्रस्ताव  मागे घेतला नसल्याचं महसुल सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्ट केलं आहे. नवी दिल्ली इथं गृहनिर्माण प्रतिनिधिांना संबोधित करताना ते बोलत होते. अतिरिक्त पैसा असणाऱ्यांना दुसरं घर खरेदी करताना कोणत्याही प्रकारची मदत सरकारकडून केली जाणार नसल्याचं ते म्हणाले. दुसऱ्या घरासाठी कर्ज घेणाऱ्यांकडून सरकारी सवलतीचा गैरवापर होत असल्याचं अधिया यांनी नमूद केलं.  

****

भारत पुढील आठवड्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अणू सुरक्षा परिषदेचं यजमानपद भुषवणार आहे. नवी दिल्ली इथं ही परिषद होणार असून, यात  १०० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली. अणू सुरक्षेसाठी जागतिक स्तरावर सहभाग वाढवण्यासाठी या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.   

****

केंद्रीय अर्थसंकल्पानं इतर मागासवर्गीयांची निराशा केल्याची टीका ओबीसी नेते हरी नरके यांनी केली आहे. ओबीसी संघर्ष समितीनं मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते काल बोलत होते. देशात ५४ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला आरोग्य, शिक्षण, रोजगार, निवारा आदी सुविधांसाठी अवघ्या एक हजार १९५ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केल्याचं ते म्हणाले. कोळी बांधवांचं नुकसान आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी शिवस्मारक अरबी समुद्राऐवजी गिरगाव चौपाटीजवळ करावं, त्यातून उरणारे पैसे मराठा समाजातल्या गरीब मुलामलींच्या शिक्षणासाठी तसंच आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत म्हणून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

//******//

No comments: