आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ एप्रिल २०२० सकाळी ११.००
वाजता
****
गेल्या
२४ तासात राज्यात कोरोना विषाणूमुळं दोन रूग्णांचा मृत्यू झाला, यामुळे राज्यात कोरोनामुळे
दगावलेल्यांची संख्या बारा झाली आहे, दरम्यान राज्यात १८ नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत.
त्यामुळे राज्यातल्या आजपर्यंतच्या एकूण कोरोना रूग्णांची संख्या ३२० झाली आहे. या
१८ नव्या रूग्णांपैकी १६ जण मुंबईचे तर दोन जण पुण्याचे आहेत.
देशभरातली
कोरोनाबाधितांची संख्या सुमारे चौदाशेपर्यंत पोहोचली आहे. या तेराशे सत्त्याण्णव रुग्णांपैकी
आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला असून १२४ रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने
रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
****
कोरोना विषाणू बद्दल आणि राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांविषयी, राज्याच्या आरोग्य विभागाकडून, आता व्हॉट्सअपवर
अधिकृत माहिती मिळणार आहे. त्यासाठी एक्क्याण्णव वीस सव्वीस बारा त्र्यॅहत्तर चौरॅण्णव या क्रमांकावर "Hi"
असा संदेश पाठवून, अद्ययावत माहिती मिळवता
येईल.
****
जालना
कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी या परिसरातला
भाजीबाजार आता खुल्या कापूस यार्डात हलवण्यात आला आहे. या भागात काही प्रमाणात पोलीस
बंदोबस्तही लावण्यात आला आहे. मात्र गर्दीची समस्या नव्या ठिकाणीही कायम दिसत असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
औरंगाबाद शहरात काल रात्रीपासून वाहनांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी हे मनाई आदेश जारी केले. यानुसार आता चौदा एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत, सायकल अथवा स्वयंचलित दुचाकी, तीनचाकी किंवा चारचाकी
वाहनं, रस्त्यावर फिरू शकणार नाहीत. आपत्कालीन
सेवा, पोलिस, आरोग्यसेवा, रुग्णसेवा तसंच माध्यम प्रतिनिधींना, या मनाई आदेशातून
सूट असेल. मात्र अशा वाहनचालकांनी, आपली
ओळखपत्रं तसंच कार्यालयानं दिलेलं पत्र, सोबत बाळगणं आवश्यक आहे.
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आता, ड्रोन पेट्रोलिंग
सुरू केली आहे. जिल्ह्यातल्या सिल्लोड, गंगापूर, पैठण, कन्नड, वैजापूर या उपविभागांच्या माध्यमातून, २३ पोलीस ठाण्याअंतर्गत
येणाऱ्या भागात, ही पेट्रोलिंग करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यात १०० टक्के लॉक डाऊन होण्यास मदत होणार असल्याचं, पोलिसांनी सांगितलं
****
No comments:
Post a Comment