Thursday, 2 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 02.04.2020 TIME 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०२ एप्रिल २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात तीन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ३३८ झाली आहे. या नवीन तीन रुग्णांपैकी दोन रुग्ण पुण्यातले तर एक रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. काल रात्रीपर्यंत या आजारामुळे दगावलेल्यांची संख्या सोळा झाली आहे, यापैकी बारा मृत्यू मुंबईत झाले आहेत.
****
दिल्लीत निजामुद्दीन इथं झालेल्या तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या बहुतांश नागरिकांचा तपास लागला असून, त्यापैकी अनेकांना विलगीकरणात ठेवण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहितीही संकलित केली जात असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनला ९५ टक्के जनता सहकार्य करत असून, सोशल डिस्टन्सिंग अर्थात समाजापासून योग्य अंतर राखणं आवश्यक असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.
****
आज राम नवमी. प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस हा राम नवमी म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम नवमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीरामांचे आदर्श जीवन लोकांना सत्य, सहिष्णुता आणि नम्रतेचा संदेश देतं, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशामध्ये सांगितलं आहे. लोकांनी या मूल्यांचे प्रामाणिकपणे पालन केलं पाहिजे, असंही राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी  आपल्या शुभेच्छा संदेशात आदर्श माणसामध्ये असलेल्या सर्व गुणांचे श्रीराम प्रतिनिधित्व करत असल्याचं सांगितलं.
****
पालघर जिल्ह्यातल्या काही भागांत काल मध्यरात्री भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता तीन रिश्टर स्केल एवढी होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी ही माहिती दिली आहे.
****


No comments: