Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 02 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०२ एप्रिल २०२० दुपारी
१.०० वा.
****
देशभरात
कोरोनाबाधितांची संख्या एक हजार ९६५ झाली आहे. यापैकी पन्नास जणांचा मृत्यू झाला असून,
सुमारे दीडशे रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीत सुधार झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात
आली आहे. सध्या देशभरातल्या रुग्णालयांमध्ये एक हजार ७६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
कोरोनाबाधितांवर
उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत देशभरातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत
आहेत. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीदरम्यान राज्या राज्यांमध्ये येणाऱ्या अडचणी तसंच
इतर बाबी पंतप्रधान जाणून घेत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे
****
गृहमंत्रालयानं
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना खोट्या बातम्यांचा प्रसार थांबवण्यासाठी योग्य
उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत. केंद्रशासन याकामासाठी एक वेबसाईट बनवणार
असून यामुळे खोट्या बातम्यांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी
आपआपल्या स्तरावही यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही गृहमंत्रालयानं केलं आहे.
****
कोरोनाचा
सामना करण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या मदतीची
गरज असल्याचं कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. आज
दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीला संबोधित करताना
त्या बोलत होत्या. खासदार राहुल गांधी यावेळी उपस्थित होते. सर्व राज्यशासनांनी या
अनुषंगाने वयोवृद्ध, फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेले लोक, मधुमेही आणि हृदयरुग्णांसाठी
विशेष सूचना प्रसिद्ध कराव्या आणि त्यांची अधिक काळजी घेतली जावी, असं राहुल गांधी
म्हणाले.
****
नागरिकांनी
लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करावं, लॉकडाऊनचा निर्णय अधिक कठोरपणे राबवण्याचा निर्णय
घेण्यास भाग पाडू नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद
पवार यांनी केलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमांवरून संवाद साधत होते. नागरिकांनी
नियमांचं काटेकोरपणे पालन केल्यास, लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागणार नाही. सध्या तरी
चौदा तारखेपर्यंत नागरिकांनी संयम पाळण्याचं आवाहन पवार यांनी केलं. खासगी वैद्यकीय
सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत, असं आवाहनही पवार यांनी केलं
आहे. आज रामनवमीचा सण नागरिक घरातच श्रीरामाचं स्मरण करून साजरा करत आहेत, पुढच्या
आठवड्यात येणारा शब ए बारात तसंच येत्या चौदा तारखेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांची जयंती नागरिकांनी घरात बसूनच साजरी करण्याचं आवाहन पवार यांनी केलं. दिल्लीत
निजामुद्दीन इथला कार्यक्रम व्हायला नको होता, असं मतही त्यांनी व्यक्त केलं
****
दरम्यान,
यवतमाळ जिल्ह्यातून निजामुद्दीन इथल्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ३४ लोकांची
माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. या पैकी २८ जणांना विलागिकरण कक्षात दाखल करण्यात
आलं आहे. सहा लोक अद्यापही जिल्ह्यात परत आलेले नाहीत. मात्र हे सहाजण ज्या गावांना
गेलेले आहेत, तिथल्या जिल्हा प्रशासनासोबत संपर्क साधला असून या लोकांची माहिती घेण्यात
येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे
शहरात सकाळी फिरण्याच्या व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्या ३२ जणांवर संचारबंदी मोडल्या
प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये दोन महिलांचा सुद्धा समावेश आहे.
****
कोरोना
संसर्गाची प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता, औरंगाबाद शहरात दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्या
अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांविरोधात आपत्ती व्यवस्थापन
कायदा तसंच जमावबंदी उल्लंघन प्रकरणी कारवाई करण्यात आली. मांस विक्रीचे दुकान सुरू
ठेवून गर्दी जमवल्याबद्दल एका दुकानदाराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
जालना
जिल्हा रुग्णालयाच्या जवळच्या इमारतीमध्ये
कोरोना ग्रस्तांसाठी स्वतंत्र रुग्णालय तयार करण्यात येत आहे. सध्या याठिकाणी
विद्युतीकरण, रंगरंगोटी, विलगीकरण कक्ष उभारणी यासह अन्य कामं वेगाने सुरु आहेत.
****
सोलापूर
जिल्ह्यात एका ग्राम सेवकाने तबलगी जमात मध्ये सहभागी झालेल्या सात जणांची तपासणी करण्याचा
आग्रह केल्यामुळे सात जणांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात वैराग
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सातही जणांची चाचणी करण्यात आलेली असून
त्यांचा अहवाल नकारात्मक आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलिस निरिक्षक मनोज पाटील
यांनी पीटीआयला दिली आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात उमरगा तारलूक्यात भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. लॉकडाउन मुळे
नागरिकांना भाजी खरेदी करण्यासाठी सकाळी काही ठराविक वेळ देण्यात आला असल्यामुळे नागरिकांनी
गर्दी केल्याचं वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान,
नांदेड शहरातल्या तरोडा बुद्रुक भागात घराघरात जतूंनाशक औषधीची फवारणी करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment