आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८ जून २०२० सकाळी ११.००
वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
सत्तर कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या तीन हजार
एकशे सहा झाली आहे. यापैकी एक हजार सातशे नऊ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून
एकशे सहासष्ट रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सध्या एक हजार दोनशे एकतीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनाने कळवलं आहे.
****
अमरावती
जिल्ह्यात आज सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात सहा पुरूष आणि एका महिलेचा
समावेश असून जिल्ह्यातली बाधितांची संख्या तीनशे एकोणनव्वद झाली आहे.
****
जळगाव
जिल्ह्यात एकशे दहा रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. त्यामुळे
जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार सत्तावन्न रुग्ण बरे झाले आहेत.
****
सोलापूर
शहर आणि जिल्ह्यात काल दिवसभरात सत्याहत्तर कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली.
त्यामुळे बाधित रुग्णांची सेख्या एक हजार आठशे सत्याऐंशी झाली आहे. तर मृतांची संख्या
एकशे चोपन्न झाली. जिल्ह्यात आतापर्यंत नऊशे एकाहत्तार जण बरे झाले आहेत तर सातशे बहात्तर
जणांवर उपचार सुरू आहेत.
****
कोरोना
संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातल्या ६९० गावातील २८ हजार ४७४ शेतकऱ्यांच्या
२ हजार ३२१ बचत गटांनी नोंदणी केली होती. त्यानुसार कृषी विभागाने या शेतकऱ्यांना १८
हजार क्विंटल सोयाबीन, ८०० क्विंटल तूर, ९८ क्विंटल कपाशी, २९७ क्विंटल मूग, ४२८ क्विंटल
उडीद, १५० क्विंटल ज्वारी यासह आदी बियाणे शेतकऱ्यांना घरपोहोच उपलब्ध करुन दिले आहेत.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी ही माहिती दिली आहे.
****
जम्मू-काश्मीरच्या
पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला. या ठिकाणाहून
दोन एके रायफल आणि एक इंसास रायफल जप्त करण्यात आल्याची माहिती सैन्याच्या अधिकाऱ्यांनी
दिली आहे.
****
No comments:
Post a Comment