आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२० मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान होत आहे. देशभरातली सहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या ४९ मतदारसंघांचा यात समावेश आहे. यामध्ये राज्यातल्या १३ मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी सहा पूर्णांक ३३ टक्के मतदान झालं.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा पूर्णांक १९ टक्के, उत्तर - मध्य मुंबई सहा टक्के, दक्षिण मुंबई पाच पूर्णांक ३४ टक्के, दक्षिण- मध्य मुंबई सात पूर्णांक ७९ टक्के, उत्तर- पश्चिम मुंबई सहा पूर्णांक ८७ टक्के तर उत्तर - पूर्व मुंबई मतदारसंघात सहा पूर्णांक ८३ टक्के मतदान झालं.
धुळे लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा पूर्णांक ९२ टक्के, दिंडोरी सहा पूर्णांक ४०, नाशिक सहा पूर्णांक ४५, पालघर सात पूर्णांक ९५ , भिवंडी चार पूर्णांक ८६, कल्याण पां पूर्णांक ३९, तर ठाणे लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत पाच पूर्णांक ६७ टक्के मतदान झालं.
****
मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी सुमारे ६०० बेस्ट बसची मोफत सेवा उपलब्ध करण्यात आली असून, मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम, दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे, उत्तर- मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड, उत्तर- मुंबई मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी मतदान केलं.
धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
****
ठाणे लोकसभा मतदासंघात मतदान केंद्र क्रमांक ३४६ वरील ईव्हीएम मशीन काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती, मात्र तिथल्या अधिकाऱ्यांनी पुढील पंधरा मिनिटात तातडीने कार्यवाही करून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू केली.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल सनराईजर्स हैदराबादनं पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. तर दुसरा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स मधला सामना पावसामुळे रद्द झाला.
****
No comments:
Post a Comment