आकाशवाणीऔरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०२ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
केंद्रीय
अर्थसंकल्पाला विकासाला गती देणारा आणि प्रगतिशील अर्थसंकल्प असल्याचं उद्योग जगतानं
म्हटलं आहे. गुंतवणूक आणि मागणी दोन्हींवर हा अर्थसंकल्प केंद्रीत असल्याचं भारतीय
उद्योग मंडळ - सीआयआयचे अध्यक्ष चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. या अर्थसंकल्पामुळे
देशाची आर्थिक बाजू मजबूत होणार असल्याचं मत फिक्कीचे सरचिटणीस डॉ. दिदार सिंग यांनी
व्यक्त केलं.
****
आज
संसदेत राज्यसभेचं कामकाज होणार असून, लोकसभेचं कामकाज दिवंगत माजी केंद्रीय मंत्री
इ अहमद यांच्या स्मरणार्थ स्थगित राहणार आहे. राज्यसभेच्या प्रस्तावित कामकाजामध्ये,
दोन्ही सदनांना संयुक्त संबोधित केल्याबद्दल राष्ट्रपतींना धन्यवाद प्रस्ताव सादर करण्यात
येणार आहे.
****
गोवा आणि पंजाब राज्यात विधानसभेसाठी
येत्या रविवारी मतदान होत आहे, या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं उमेदवारांना पूर्वपरवनागीशिवाय
उद्या आणि परवा वृत्तपत्रातून जाहिराती प्रसिद्ध करण्यास मनाई केली आहे. दरम्यान, संरक्षण
मंत्री मनोहर पर्रिकर यांना निवडणूक आयोगानं आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी नोटीस बजावली
असून, उद्या दुपारपर्यंत यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष
आणि आम आदमी पक्षानं पर्रिकर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
****
महानगरपालिका निवडणुकांतील
उमेदवारांसाठी खर्चाची सुधारीत मर्यादा १० ते ५ लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी मुंबई
इथं ही माहिती दिली. जिल्हा परिषदांच्या उमेदवारांसाठी ही मर्यादा सहा ते चार लाख
आणि पंचायत समित्यांच्या उमेदवारांकरिता चार ते तीन लाख रुपयापर्यंत करण्यात आली
आहे.
****
कैलास मानसरोवर यात्रेसाठी नावनोंदणी
सुरु झाली आहे. १२ जून ते आठ सप्टेंबर ही यात्रा चालणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार
मंत्रालयानं सांगितलं. नोंदणीची अंतिम तारीख १५ मार्च असून, प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन
करण्यात आली आहे.
//*******//
No comments:
Post a Comment