आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येठ नेते जयराम ठाकूर आज हिमाचल प्रदेशच्या
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत्त आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत त्यांना पद आणि गोपनीयतेची
शपथ देतील. शपथग्रहण समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ
नेते लालकृष्ण अडवाणी, आठ केंद्रीय मंत्री तसंच भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री
उपस्थित राहणार असल्याचं वृत्त आहे.
****
संसदेचं सत्र चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज पुन्हा सुरू झालं.
शीतकालीन सत्राचा सुमारे निम्मा कालावधी संपला असून, कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यानं,
विशेषत: राज्यसभेत अनेक विधेयकं प्रलंबित अवस्थेत आहेत. मुस्लिम महिलांच्या विवाहविषयक
हक्कांच्या संरक्षणासंदर्भातलं विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाणार आहे.
****
उत्तर भारतात थंडीची लाट सुरू असून, काश्मीर मध्ये तपमान शून्याखाली
गेलं आहे. हिमाचल प्रदेशच्या किलांग विभागात पारा उणे आठ अंशांवर गेला आहे. पंजाब आणि
हरियाणामध्येही थंडीचा जोर वाढला असून तिथलं किमान तपमान एक ते तीन अंशांवर आलं आहे.
****
राज्यातल्या २७ जिल्ह्यांतल्या जानेवारी-फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ६७१ ग्रामपंचायतींच्या
निवडणुकीसाठी काल सरासरी ८२ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य
निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी काल मुंबईत दिली. आज या मतदानाची मतमोजणी केली जात आहे.
****
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ आज दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर
जात आहे. या दौऱ्यात तीन कसोटी सामने, सहा एक दिवसीय सामने तसंच तीन टी ट्वेंटी सामने
खेळवले जाणार आहेत. पहिला कसोटी सामना केपटाऊन इथं पाच जानेवारीपासून सुरू होणार आहे.
तर अखेरचा टी ट्वेंटी सामना २४ फेब्रुवारीला केपटाऊन इथंच खेळवला जाईल.
*****
No comments:
Post a Comment