आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
९ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या पाश्वभुमिवर ठिकठिकाणी चोख पोलिस बंदबस्त लावण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात
शैक्षणिक संस्थांसह, बस तसंच रिक्षा वाहुतक, बंद असून, बहुतांशी व्यापारी प्रतिष्ठानं
या बंद मध्ये सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन तसंच रास्ता रोको
आंदोलन सुरु आहे.
परभणी जिल्ह्यात परभणीसह सर्वच
तालुक्यात बंद पाळण्यात येत असून, जवळपास सगळे व्यवहार ठप्प आहेत. जालना जिल्ह्यातही
बहुतांशी व्यवहार बंद आहेत. अंबाजोगाई इथंही रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. औरंगाबाद
इथंही बंदचा परिणाम दिसून येत असून, मराठा मोर्चाच्या वतीनं शहरातून वाहन फेरी काढून
घोषणाबाजी करण्यात येत आहे. औरंगाबाद जळगाव तसंच औरंगाबाद जालना मार्गावर ठिय्या आंदोलन
करून, आंदोलकांनी मार्ग रोखून धरला आहे. अहमदनगर जिल्ह्यात बंद च्या पार्श्वभूमीवर
बसवाहुतक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
मात्र मुंबई, ठाणे, नाशिक आणि
धुळे या जिल्ह्यांमध्ये बंद न पाळता शांततेत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
****
‘छोडो भारत’ आंदोलनाचा
आज शहात्तरावा वर्धापनदिन आहे. १९४२ साली आजच्याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांनी मुंबईत गोवालिया टँक इथून, ब्रिटिशांना छोडो भारत असा इशारा देत, तमाम भारतीयांना ‘करा किंवा मरा’ अशी
हाक दिली होती. हा दिवस दरवर्षी ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी छोडो भारत चळवळीत सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं आहे.
****
राज्यसभेच्या उप सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आज
मतदान होत आहे. या पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे संयुक्त जनता दल चे हरिवंश
नारायण सिंह आणि विरोधी पक्षांतर्फे बी. के. हरिप्रसाद या दोघांनी काल अर्ज भरले. या
प्रस्तावावर प्रथम आवाजी मतदान घेण्यात येईल आणि मतविभाजनाची गरज भासल्यास प्रत्यक्ष
मतदान घेण्यात येईल.
****
जम्मू-कश्मीरच्या
गुरेज सेक्टर इथं दहशतवाद्यांची दोन हात करताना वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या
पार्थिव देहावर आज ठाणे जिल्ह्यातल्या मीरारोड इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत
आहेत. राणे यांचा पार्थिव देह काल संध्याकाळी मुंबईत आणण्यात आला.
*****
***
No comments:
Post a Comment