आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पश्चिम ओडिशामधल्या पहिल्या
विमानतळाच्या उद्गाटनाचा कार्यक्रम झारसुगुडा इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
उपस्थितीत सुरु आहे. त्यामुळे ‘उडान’ योजनेद्वारे
पश्चिम ओडिशा देशाच्या हवाई नकाशावर येईल. गर्जनबहल
कोळसा खाणी आणि झारसूगुडा बारापली-सारडेगा-रेल्वेमार्गाचं
राष्ट्रार्पणही पंतप्रधान या दौऱ्यात करणार आहेत. दुलंगा
कोळसा खाणीमधून कोळशाचं उत्पादन आणि वाहतुकीचा प्रारंभ यावेळी होत आहे. ओडिशातल्या
तालचेर इथल्या नालचेर खत प्रकल्पांच्या पुनर्बांधणी कार्याचा शुभारंभ देखील
पंतप्रधान करणार आहेत. कोळशाच्या वायूवर आधारित खतनिर्मिती करणारा हा
देशातला पहिलाच प्रकल्प आहे. खतांबरोबरच नैसर्गिक वायूची निर्मितीही या
प्रकल्पातून होणार असल्यानं देशाच्या ऊर्जेची गरज काही अंशी भागू शकेल. त्या नंतर पंतप्रधान छत्तीसगढ दौऱ्यावर जाणार आहेत.
****
परदेशी
गुंतवणूकदार संस्थासाठीच्या केवायसी
पात्रता निकषांमध्ये बदल करुन
भारतीय प्रतिभूती आणि नियामक मंडळ -
सेबीनं त्यांना दिलासा दिला आहे. काही विशिष्ट परकीय गुंतवणूकदार
संस्थाना लाभार्थी मालकांची सूची बनवून नियंत्रकांना सादर करणं आवश्यक आहे. आता या
दोन विशिष्ट गटातल्या संस्थांना ही सूची आणि इतर केवायसी कागदपत्रांची
पूर्तता करायला सहा महिन्याचा अवधी असेल.
****
कचरा उचलण्यासाठी पंढरपूर नगर पालिकेने अत्याधुनिक
यंत्रसामुग्रीचा वापर सुरु केला असून, तसाच प्रयोग लातूर महानगरपालिका करणार असल्याची
माहिती महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे. ते काल लातूर इथं वार्तालाप
कार्यक्रमात बोलत होते. कचरा व्यवस्थापनात औरंगाबाद सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये
म्हणून, कचरा उचलण्याची निविदा काढण्यासाठी शासनाला नव्यानं प्रस्ताव पाठवल्याचं, त्यांनी
सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २८० गावात एक गाव एक गणपती
ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी काल ही
माहिती दिली. जिल्ह्यातल्या बाराशे गणेश मंडळाना यंदा प्रथमच गणेशोत्सवाचे ऑनलाईन परवाने
देण्यात आले आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment