Tuesday, 6 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****

 जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक तसंच जम्मू काश्मीर आरक्षण संशोधन विधेयक गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत सादर केलं. काँग्रससह विरोधी बाकांवरच्या अनेक सदस्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला. पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे जम्मू काश्मीरचाच भाग असून, जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न भाग असल्याचं, शहा यांनी हे विधेयक मांडताना नमूद केलं.

 काँग्रेसचे सदस्य मनीष तिवारी यांनी, या विधेयकाला विरोध करत, जम्मू काश्मीरचं एक स्वतंत्र संविधान आहे, राज्याच्या विभागणीनंतर त्या संविधानाचे काय होणार, असा प्रश्न विचारला. या विभाजनापूर्वी केंद्र सरकारने संबंधित राज्याच्या संविधानाचा विचार केला नाही, असा आरोप तिवारी यांनी केला. भाजपचे जुगलकिशोर शर्मा तसंच डॉ जीतेंद्रसिंह यांनी या विधेयकाच्या बाजूने तर द्रविड मुनेत्र कळघमचे टी आर बालू तसंच तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनी या विधेयकाच्या विरोधात मत मांडलं.

 काल राज्यसभेत हे विधेयक १२५ विरुद्ध ६१ मतांनी संमत झालं आहे.

 दरम्यान, राज्यसभेत आज ग्राहक संरक्षण विधेयक २०१९ वर चर्चा सुरू आहे.
****

 जम्मू काश्मीरच्या विभाजनानंतर, पश्चिम बंगालचे विभाजन करून, दार्जिलिंग हा केंद्रशासीत प्रदेश करावा, अशी मागणी दार्जिलिंग भागातल्या राजकीय पक्षांकडून केली जात आहे. याप्रकरणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन भारतीय जनता पक्ष निश्चितच पाळेल, असं दार्जिलिंगचे भाजप खासदार राजू बिस्ता यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधल्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षानं मात्र या मागणीला विरोध दर्शवला आहे
****

 अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर निर्मोही आखाड्यानं दावा केला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नुसार आज झालेल्या सुनावणीत निर्मोही आखाड्यानं, या संपूर्ण जागेवर दावा सांगत, सुमारे पावणे तीन एकरांचा हा परिसर गेल्या शेकडो वर्षांपासून आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलं. रामजन्मभूमी परिसराच्या आतलं अंगण, अंगणातली सीता रसोई, चौथरा, तसंच भंडारगृह याचा ताबा कायम निर्मोही आखाड्याकडे होता, आणि त्याबाबत कधीही कोणताही वाद नव्हता, असं आखाड्याकडून सांगण्यात आलं. या सर्व जागेचा ताबा आणि व्यवस्थापन निर्मोही आखाड्याकडे सोपवावं, अशी मागणी आखाड्यानं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणातल्या कोणत्याही पक्षाचा युक्तिवाद थांबवण्याचा न्यायालयाचा विचार नाही, सर्व पक्षांनी युक्तिवाद करताना, न्यायालयाची प्रतिष्ठा राखावी, असं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं म्हटलं आहे.
****

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवस यांची महाजनादेश यात्रा आज वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं पोहोचणार आहे. यात्रेचं आगमन झाल्यानंतर कारंजा इथं, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभेचआयोजन करण्यात आलं आहे
****

हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उद्या दुपारी १२ वाजता राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह "महा ई -संवाद" साधणार आहेत.  राज्यातले सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसंच सर्व गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी मुनगंटीवार थेट चर्चा करतील.
*****

 ाज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे काही भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामूळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सखल भाग जलमय झाला आहे. अनेक भागात द्यांचं पाणी पुलांवरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात २०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सावंतवाडी इथं सर्वाधिक ३७० मिलिमीटर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 सांगली तसंच सातारा जिल्ह्यागेल्या चार ते पाच दिवसापासून मुसळधार पास होत असल्यानं सांगलीत कृष्णा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. नदीकाठची शेतं तसंच वसाहतींमध्ये पाणी शिरलं सू, जिल्यातल्या सुमारे दहा हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल  एन डी आर एफ चं पथक दाखल झालं आहे.

 दरम्यान कराड -पुणे हा मार्ग जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद केला असुन फक्त हलक्या वाहनांना या मार्गावरून वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे
 दरम्यान, पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे एक लाख एकसष्ठ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणी पातळी सध्या ७ टक्क्यांवर पोहोचली आहे.
****
 बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं आज होणारी जिल्हास्तरीय वुशू क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा आता येत्या ४ सप्टेंबर ला होणार आहे. बीडच्या क्रीडा अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****

 वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीथं आज दोन जणांना गावठी बनावटीच्या पिस्तुलासह अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात मंगरुळपीर पोलिस ठाण्यात अवैध शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*****
***

No comments: