आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ ऑगस्ट २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आज जालना आणि औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या महाजनादेश
यात्रेचं आज दुपारी एक वाजता शहागड इथं स्वागत
होणार आहे. दुपारी अडीच वाजता अंबड इथं महाजनादेश यात्रा जाहीर सभा होणार आहे. औरंगाबाद
मधील महाजनादेश यात्रा संध्याकाळी पाच वाजता चिकलठाणा इथून त्यांच्या उपस्थितीमध्ये
सुरू होणार आहे. मुख्यमंत्री संध्याकाळी सात वाजता खडकेश्वर इथल्या सांस्कृतिक मंडळाच्या
मैदानावर जाहीर सभा घेणार असून रात्री आठ वाजता मुंबईला रवाना होणार आहेत.
****
लातूरमध्ये स्वतंत्र
विद्यापीठ उभारण्याच्या मागणीसाठी `आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीनं`
काल शहरातल्या गांधी चौकात धरणं आंदोलन केलं. लातूर पॅटर्नमुळे सर्वत्र ओळख असणाऱ्या
लातूर जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावं, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी
केली. मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं.
****
सांगली इथल्या पूरग्रस्तांनी
संसार उपयोगी वस्तूंच्या मागणीसाठी कर्नाळ
रस्त्यावर आज सकाळी `रस्ता बंद` आंदोलन केलं. सांगलीत महापूराच पाणी अनेकाच्यां
घरात शिरल्यानं अनेकांच संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे. सांगली महापालिकेच्या
वतीनं संसार उपयोगी साहित्य वाटप मोहीम सुरू आहे, मात्र जाणूनबुजून कर्नाळ रस्त्यावरील
नागरिकांवर यात अऩ्याय करण्यात आल्याचा आरोप आहे.
****
सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील महापूरIला कर्नाटकातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात
आली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस इथले डॉ. अमोल पवार आणि विधिज्ज्ञ सचिन पाटील यांनी
ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेची पहिली सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे.
****
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या एकोणसाठाव्या राज्य नाट्य स्पर्धा प्रवेशिका भरण्यासाठी सोळा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातल्या
काही जिल्ह्यांतली पूरस्थिती पाहता ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचं संचालनालयानं कळवलं
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment