आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ ऑगस्ट २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अंबादास
दानवे यांनी तब्बल ५२४ मतं घेत दणदणीत विजय मिळवला आहे. दानवे यांनी काँग्रेस आघाडीचे
भवानीदास कुलकर्णी यांना 418 मतांनी पराभूत केलं. कुलकर्णी यांना १०६ मतं मिळाली.
****
कोहीनूर मिल गैरव्यवहार
प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज अंमलबजावणी संचालनालय
- ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हायचं आहे. ईडीने या प्रकरणी ज्येष्ठ शिवसेना
नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेश जोशी यांनी सलग तीन दिवस चौकशी केली.
दरम्यान या कारवाईच्या
पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी आज शांततापूर्ण मार्गाने आंदोलनाचा इशारा दिला
आहे.
****
आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी कॉंग्रेसचे
ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय न्यायालयासमोर
हजर केलं जाईल. सीबीआयनं चिदंबरम
यांना काल रात्री दिल्लीतल्या त्यांच्या घरातून अटक केली.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना,
शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी आणि स्वतंत्र भारत पक्ष यांची संयुक्त राज्य
कार्यकारिणी बैठक आज आणि उद्या औरंगाबाद इथं होत आहे. उस्मानपुरा भागातल्या कलश मंगल
कार्यालयात आयोजित या बैठकीत निवडणुकीसह, संपूर्ण कर्जमुक्ती, पीक वीमा योजना, तंत्रज्ञानाचे
स्वातंत्र्य, बाजारपेठेचे स्वातंत्र्य तसंच शेती विरोधी कायदे आदी विषयांवर चर्चा होणार
आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान, दोन सामन्यांची कसोटी
क्रिकेट मालिका आजपासून वेस्ट इंडिज इथं सुरु होत आहे. कर्णधार विराट कोहली याच्या
नेतृत्वात भारतीय संघ हे सामने खेळणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment