आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ ऑगस्ट २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
फिट इंडिया मुव्हमेंट या चळवळीला पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आजपासून सुरुवात केली. आज राष्ट्रीय क्रीडा दिनी, नवी दिल्लीत सुरू
असलेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांनी ही माहिती देत, हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या
स्मृतींना अभिवादन केलं.
औरंगाबाद इथं आज शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंसह
खेलो इंडीया स्पर्धेतल्या खेळाडूंचा, क्रीडा भारती आणि औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेच्या
वतीनं गौरव करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विजय झोल यांच्या हस्ते या
खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असल्याचं संघटनेनं कळवलं आहे.
****
राज्यात पाच लाख
८३ शेतकऱ्यांना दुष्काळ निधीचं वाटप केलं असून, दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना सुरू
असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज जालना इथं पत्रकार
परिषदेत बोलत होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर,
राज्यमंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. परतीच्या पावसाचा
अंदाज घेऊन, दुष्काळ निवारण योजनांचा आढावा घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
जलयुक्त शिवार योजनेमुळे
१९ हजार गावांमध्ये जलसंधारणाचं प्रमाण वाढलं तसंच दुष्काळाची दाहकता कमी झाल्यानं,
ही योजना ठरल्याचा अहवाल, उच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनं सादर केल्याची
माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मराठी हा विषय बारावीपर्यंत
सक्तीचा करण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं. युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या
जनाशिर्वाद यात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. संघर्षाच्या
काळात शिवसेना आणि भाजप हे मित्रपक्ष सोबत होते, सत्तेच्या काळातही सोबतच राहतील, असा
विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
मराठवाड्यातल्या १९ शिक्षकांची
राज्य सरकारच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. यात प्राथमिक, माध्यमिक
आणि इतर गटांमधल्या शिक्षकांचा समावेश आहे. काल याबाबतचा आदेश जारी करण्यात आला.
*****
***
No comments:
Post a Comment