Thursday, 29 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.08.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात, राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलिट दिपा मलीक यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा, फुटबॉलर गुरुप्रीत सिंग सिंधु, हॉकीपटू चिंगलेनसना कांगुजम, धावपटू मोहम्मद अनस, ॲथलीट स्वपना बर्मन आणि नेमबाज अंजूम मुदगील यांना अर्जून पुरस्कार, तर क्रिकेटपटू संजय भारद्वाज यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
हॉकीपटू मेन्युअल फेड्रीक, टेनिसपटू अरुप बसक, कुस्तीपटू मनोज कुमार, तीरंदाज सी लालरेमसंगा आणि टेनिसपटू नीतीन कीर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला.
साहसी क्रीडा प्रकारासाठीचा तेनसिंग नोर्गे क्रीडा पुरस्कार पोलिस अधिकारी अपर्णा कुमार, मणिकंदन के, प्रभात राजू कोळी, रामेश्वर जांगडा, सुभेदार मेजर वांगचुक शेर्पा यांना प्रदान करण्यात आला. दीपांकर घोष यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
****
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी शासनानं नियोजनबद्ध पाऊले टाकण्यास सुरुवात केली असून मार्च २०२० पर्यंत यासाठीचा परिपूर्ण आराखडा तयार होईल असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाच्या वतीनं मुंबईत घेण्यात आलेल्या व्याख्यानमाले "महाराष्ट्र: एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल" याविषयावर ते आज बोलत होते. उद्योग क्षेत्रातलं महिलांचं ९ टक्के योगदान २० टक्क्यांवर नेण्याचा संकल्प राज्याच्या औद्योगिक धोरणात  जाहीर करण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत शिवसेना प्रमुखांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेतली. अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अवधूत यांनी, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात राहण्याची इच्छा असल्यानं ठाकरे यांची भेट घेतली असून, येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं. अवधूत हे रायगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत.
****
धुळे जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळे क्षेत्रीय अधिकार्‍यांनी प्रत्येक मतदान केंद्रातील सुविधांची पाहणी करावी, तसेच तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश धुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डी.गंगाथरन यांनी दिले आहेत.
 आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रात आवश्यक बाबींची खात्री करावी, संवेदनशील, अतिसंवेदनशील केंद्र, निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळ, आवश्यक साहित्य, पोलिस बंदोबस्त आदींची यादी तयार करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळेस दिल्या.
****
लातुर जिल्ह्यातल्या आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला बचत गटाच्या कुटुंबांना गोल्डन कार्ड तयार करून देण्यासाठी महानगरपालिका विशेष मोहीम राबवित आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी भागातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये त्यासाठी विशेष  शिबीराचं आयोजन करण्यात येणार असुन सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा समन्वयक डॉ कुलदीप शिरपूरकर यांनी केलं आहे
****
अमरावती इथं उत्तम पायाभूत सुविधांसाठी  निधी आणि वेळेत काम पूर्ण करण्यावर शासनानं भर दिल्यानं जिल्ह्यातील शहरांची आदर्श नगरपालिकेकडे वाटचाल होत असल्याचं  प्रतिपादन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केलं. ते आज वरुड  इथं एका कार्यक्रमात बोलत होते. जिल्ह्यात. प्रशासकीय इमारती, जलतरण तलाव, पाणी पुरवठा आदी कामांसह भूमिगत वीजवाहिनीसारखे  उपक्रम प्रस्तावीत आहेत. असं ते यावेळी म्हणाले.
****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...