Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 24 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा.
****
माजी केंद्रीय अर्थमंत्री
अरूण जेटली यांचं थोड्या वेळा पूर्वी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं आहे. ते
६७ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून जेटली आजारी होते आणि त्यांना एम्स रुग्णालयात
भरती करण्यात आलेलं होतं. गेल्या वेळच्या मोदी मंत्रीमंडळात त्यांनी अर्थमंत्री तसंच
संरक्षण मंत्री म्हणून काम केलं होतं.
****
स्ंयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं आज राजधानी अबुधाबीमधे आगमन झालं. मोदी सध्या फ्रान्स, स्ंयुक्त
अरब अमिरात आणि बहारीनच्या या तीन देशाच्या दौऱ्यावर आहेत. मोदी आज अमिरात राजे शेख
मोहम्मद बीन झायेद अल नाह्यन यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते उभय देशांच्या
संबंधांची एकूणच रुपरेषा ठरवणार आहे. तसंच प्रादेशीक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमधील
समान हिताच्या मुद्द्यांवर देखील हे दोन्ही नेते चर्चा करणार आहे. यावेळी पंतप्रधान
मोदी सौदी अरेबियाचा सर्वोच्च युएई-ऑर्डर ऑफ झायेद पुरस्काराच स्वीकार करणार आहेत.
तसंच महात्मा गांधीच्या १५० जयंतीनिमित्त यावेळी महात्मा गांधी यांच्या वरील तिकीटाचं
अनावरण देखील करण्यात येणार आहे.
****
कर्नाटकातील अलमट्टी
धरणाची वाढवलेली उंची आणि २००५ ची पूर रेषा यामुळे सांगली, कोल्हापूर भागात महापूर
आला. त्यावेळी सत्तेवर असलेली काँग्रेसचं या महापुरासाठी जबाबदार आहे, असा दावा महसूलमंत्री
चंद्रकांत पाटील यांनी केला. तर दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याच्या नादात भाजपला अलमट्टीचा
विसर पडला, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. संकटग्रस्त
भागांतील लोकांना लवकर मदत पोहोचावी अशी लोकांची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप काही भागात
महापुराचे पंचनामेही सुरू झाले नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कृष्णा आणि वारणा नदीला
आलेल्या महापुरामुळे सांगली जिल्ह्यात नदीकाठावरील जमीन पिकासह वाहून गेली आहे. ऊस
हे मुख्य पीक वाहून गेल्यामुळं या भागातला साखर हंगाम संकटात सापडला आहे. सांगली जिल्ह्यातल्या
वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यात सर्वाधिक उसाच क्षेत्र आहे. मात्र, पुरामुळे
ऊस पीक मोठ्या प्रमाणात महापुरात वाहून गेल आहे. जिल्ह्यातल्या चार तालुक्यांत दहा
साखर कारखाने असून दुष्काळी भागातील सात साखर कारखान्यांना याच क्षेत्रातून उसाचा पुरवठा
केला जातो. पुरेसा ऊस नसेल तर साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु करणे इथल्या कारखान्यांसाठी
अवघड होणार असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा
गांधी मिशन संस्थेत दोन दिवसीय राज्यस्तरीय पाणी परिषदेचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते
नाशिक इथून सायकलपटूंनी आणलेल्या गोदावरी नदीचं पाणी झाडांना टाकून करण्यात आलं. पुढील
पिढीसाठी पाणी संवर्धनाचं काम सर्वच क्षेत्रातल्या नागरिकांनी करणं गरजेचं असल्याचं
मत मान्यवरांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलं. या दोन दिवसीय परिषदेत जलसंवर्धन, वृक्षलागवड
आणि भूगर्भातील पाणी, कृषी आणि सिंचन पाण्याचा उपयोग, सामाजिक स्वयंसंस्थाचं पाण्याविषयी
कार्य, शासकीय योजना जलयुक्त शिवार, शेततळे, सौर उर्जा या विषयांवर तज्ञ मार्गदर्शन
करणार आहेत.
****
संभाजी ब्रिगेडच्या संसदीय
समितीची बैठक २२ ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांच्या
प्रमुख उपस्थितीत पुणे येथील कार्यालयात पार पडली. त्यामध्ये संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी
उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब केले असल्याचं औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार
परिषदेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितलं. त्यानंतर
पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आमचा राजकीय अजेंडा ठरलेला आहे. जुन्या आणि
निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक लढवीत असल्याचे,
डॉ. भानुसे यावेळी म्हणाले.
दरम्यान संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई मशीन हे अधिकृत
चिन्ह मिळालं आहे.
****
ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या शांतीनगर पिरानी पाडा इथली चार मजली इमारत आज कोसळली.
*****
***
No comments:
Post a Comment