Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 02 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२
नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
भाजपच्या मित्र पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं
आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी भाजपसोबत
यावं, असं आवाहन रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या
भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केलं. शिवसेनेनं आता या विषयावर ओढताण करू नये, असं आठवले
म्हणाले. राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत दिली जावी,
अशी मागणीही या शिष्टमंडळानं राज्यपालांकडे केल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.
रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे रामदास
आठवले यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही आता भेट घेत आहेत.
****
राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात
भाजप आणि शिवसेने दरम्यानची चर्चा अद्याप व्हायची आहे. या पार्श्र्वभूमीवर राज्यात
राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी म्हणजे, जनादेशाचा अपमान असल्याची प्रतिक्रीया
शिवसेना नेते संजय राऊत यांनी नोंदवली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे
नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी सत्ता स्थापनेच्या पार्श्वभुमीवर राज्यात राष्ट्रपती
राजवट लागू करण्यासंदर्भातील वक्तव्य़ केलं होतं. त्यावर राऊत प्रतिक्रीया देत होते.
युतीमधे सत्ता स्थापनेसाठी कोणतीही चर्चा सुरू नसून, त्या संदर्भात केवळ अफवा सुरू
आहेत, असं त्यांनी नमुद केलं. ज्यांच्याकडे बहुमत असेल, ते राज्यात सरकार बनवतील असंही
राऊत या वेळी म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
आज थायलंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्यात ते सोळाव्या आसियान भारत परिषदेत,
चौदाव्या पूर्व आशिया परिषदेत आणि तिसऱ्या प्रांतीय सर्वसमावेश आर्थिक भागीदारी परिषदेत
सहभागी होतील. परराष्ट्र मंत्रालयातील पुर्वेकडील देशाच्या सचिव विजया ठाकूर सिंग यांनी
नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. थायलंडच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणावरुन
पंतप्रधान हा दौरा करत आहेत.
****
मोटार वाहन दुरुस्ती
कायदा २०१९ हा महसूल वाढवण्यासाठी नसून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी असल्याचा पुनरुच्चार
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला
आहे. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. या कायद्याच्या अंमलबजावणीची धुरा त्या
– त्या राज्यांवर आहे, असंही गडकरी यांनी यावेळी नमुद केलं.
****
मराठवाड्यातल्या अनेक भागात काल अवकाळी पावसानं हजेरी
लावली. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा, कळमनुरी, आखाडा बाळापूरसह अनेक भागात काल जोरदार
पाऊस झाला. परभणीतही पहाटेपर्यंत पाऊस सुरु होता. जालना जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाऴ
वातावण असून अधुन मधून पावसाच्या सरी पडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड
शहरातही रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात
वार्षिक सरासरीच्या त्र्याण्णव टक्के पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर होऊन,
टँकर बंद झाले आहेत. जळगांव, ठाणे आदी जिल्ह्यांतही पाऊस पडत आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार
कायम असल्यानं विविध प्रकल्पांमधून मोठ्या
प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे चिखली – बुलडाणा, खामगाव – जालना हे मार्ग काही कालावधी करता बंद
होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हनुमान सागर प्रकल्प भरल्यामुळं त्या मधुनही पाणी
सोडावं लागणार आहे.
दरम्यान, प्रशासनानं बुलडाणा
जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आले.
****
धुळे जिल्ह्यातल्या हातनूर धरणातून अकरा हजार नव्वद
घनफुट प्रती सेंकंद पाणी तापी नदीच्या पात्रात सोडण्यात आलं, त्यामुळे तापी नदीपात्रा
काठच्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे संबंधीत
पाणी पातीऴीत वाढ होऊ शकते, म्हणून कोणीही नदीपात्रात किंवा नदीपात्रा जवळ जाऊ नये,
असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे करण्यात आलं आहे.
****
ओदिशामधल्या भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या ऑलिंपिक
चाचणी हॉकी स्पर्धेत यजमान भारतानं रशियाचा
४-२ असा सहज पराभव केला. भारताच्या मनदिप सिंग यानं दोन तर हरमनप्रित सिंग आणि सुनिलनं
प्रत्येकी एक-एक गोल केला. रशियाच्या आंद्र कुरेव आणि सिबेन यांनी गोल केले. भारतीय
संघाचा कर्णधार मनप्रित सिंग याला सामानावीर किताब घोषित करण्यात आला.
भारतीय महिला हॉकी संघानं अमेरिका संघाचा ५-१ असा सहज पराभव केला गुरजित कौरनं दोन तर लिलिमा
मिंज, शर्मिला देवी आणि नवनित कौर यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारतीय पुरुष आणि महिला
संघ आज याच संघाबरोबर दुसऱ्या टप्प्यासाठी सामने खेळतील. या सामन्यातील पात्र महिला
आणि पूरुष संघाचं स्थान 2020 मधे टोकियो इथं होणाऱ्या ऑलिपिक स्पर्धेसाठी निश्चित होणार
आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या झिरवापाडा
इथं शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. धर्मा जाधव यांनी अवकाळी पावसामुळे शेतातल्या पिकाचं
नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केल्याची तक्रार कुंटूंबीयांनी केली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment