Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 17
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
गणपती पाठोपाठ आज घरोघरी महालक्ष्मींचं आगमन होत आहे.
अनेक ठिकाणी तीन दिवसांच्या गणेशाचं आज विसर्जन केलं जातं आणि गौरी आवाहन करून घरोघरी
महालक्ष्मींचं आगमन होतं. गौरी आवाहन, पूजनासाठी सकाळी ६ वाजून २३ मिनिटांपासन ते सायंकाळी ७ वाजून
५२ मिनिटांपर्यंतची मुहूर्त वेळ आहे. महालक्ष्मीच्या सणानिमित्त बाजारपेठे सजली असून
बाजारपेठांमध्ये महालक्ष्मीचे आकर्षक, सुंदर मुखवटे विक्रीसाठी आले आहेत. मुखवट्यांसोबतच नागरिकांनी
सजावटीच्या सामानाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे.
****
आज ७९ वा हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा होत आहे. १७
सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात
विलीन झालं. मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या
स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. या
कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सर्व लोकप्रतिनिधी, आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यंदा अवर्षणामुळे संकटात
सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी
दिली.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
प्रांगणात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.
यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
बीड इथं पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या
हस्ते झालं. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना प्रशासनातर्फे अभिवादन
करुन स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आलं. यासोबतच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शहरातील हुतात्मा
स्मारक परिसरामधील राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन
केले.
****
मुक्तीसंग्राम दिनानिमित्त नांदेड इथं पालकमंत्री अतुल
सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री
प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झीरवळ यांच्या हस्ते, तर लातूर इथं हुतात्मा स्मारक परिसरात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे
भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री
मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते, तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या
हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला २५
वर्षे पूर्ण होत आहेत. हा प्रवास 'जनसेवेतून राष्ट्रसेवा' या मंत्राने आणि आजही कायम असलेल्या अथक कटिबद्धतेने घडला आहे.
सेवा आणि सुशासनाच्या या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, सरकार २०४७ पर्यंत 'विकसित भारत' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे. सर्वसमावेशक
विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही निष्ठा लोकांचं जीवनमान बदलत आहे.
यानिमित्त आणि आज साजरा होत असलेल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून ते १७
ऑक्टोबरदरम्यान देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे.
****
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आशीर्वाद का
दिया’ हा विशेष उपक्रम देशात राबवला जात आहे. हा उपक्रम म्हणजे आपुलकीचा विशेष भाव
असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. या उपक्रमानं
आपल्याला मनापासून स्पर्श केल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक आशीर्वाद भारताची अधिक
समर्पण भावनेनं सेवा करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करतो, असंही मोदी यांनी नमूद केलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज संध्याकाळी सहा ते सात वाजे
दरम्यान प्रत्येकजण आपल्या घरी ‘आशीर्वाद का दिया प्रज्वलित करूया आणि पंतप्रधानांच्या
उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य तसंच मंगलमय जीवनासाठी
प्रार्थना करूया, असं आवाहन केलं आहे.
****
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला तीन महिन्यांची
मुदत देत, आपलं उपोषण मागे घेतलं. जरांगे यांच्या
भेटीसाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटेच दाखल झालं. या शिष्टमंडळात
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे. त्यानंतर
झालेल्या चर्चेअंती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत, आपला मुंबई दौराही रद्द केल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात
दाखल करण्यात आलं असल्याचं वृत्त आहे.
****
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तीन
टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज दिल्ली इथं
खेळवला जाणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं या
मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment