Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 27 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
मानवी
तस्करी हा समाजासाठी सर्वात मोठा धोका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
म्हटलं आहे. मुंबईत राज्य महिला आयोगानं आयोजित केलेल्या महिला तस्करीबाबतच्या आंतरराष्ट्रीय
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मानवी तस्करी, विशेषकरुन लहान मुलांची तस्करी
रोखण्यासाठी राज्य शासन उपाययोजना करत असून, शासनाच्या मुस्कान या प्रकल्पाच्या मदतीनं
बालकांच्या तस्करीचा दर ४० टक्क्यांवरुन पाच टक्यांवर आला असल्याचं ते म्हणाले. या
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सहाय्यानं आपण महिला तस्करीचं कायमचं उच्चाटन करु, असा विश्वास
मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
महिला
आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, अभिनेता
अक्षय कुमार, घानाच्या द्वितीय महिला हाजिआ समीरा बाऊमिना, तसंच आंतरराष्ट्रीय न्याय
आयोगाचे मुख्य अधिकारी गॅरी हॉगेन यावेळी उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत
३०० वक्ते आणि वीसहून अधिक देशातले प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
****
शेतकरी
कर्जमाफीची आकडेवारी फसवी असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी
आज विधान परिषदेत केला. कर्जमाफीबद्दल सरकारचं अभिनंदन करणाऱ्या प्रस्तावावर ते बोलत
होते. शेतमालाचे प्रक्रिया उद्योग कसे उभे राहतील आणि टिकतील, याकडे सरकारनं लक्ष द्यावं
असं ते म्हणाले. साखरेवरची निर्यात बंदी शंभर टक्के उठवण्याची मागणीही त्यांनी यावेळी
केली.
आमदार
अमरसिंह पंडित यांनीही साखर, कांदा तसंच टोमॅटोला अत्यावश्यक वस्तू कायद्यातून वगळण्याची
मागणी केली.
आदिवासी
विकास विभागातल्या गैरव्यवहाराबाबतच्या प्रश्नावर संबंधित खात्याचे मंत्री विष्णू सावरा
समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही, त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा प्रश्न
राखून ठेवला.
राज्यात
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध
करून देण्यात येत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आमदार
बाळाराम पाटील यांनी राज्यात ग्रीन एनर्जी निर्माण करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला
ते उत्तर देत होते.
****
पीक
विमा योजनेचा लाभ राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींची
तातडीनं बैठक बोलवावी, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज सरकारला
दिले. काँग्रेसच्या सदस्यांनी हा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर बोलताना
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, राज्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत
सामावून घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी विशद केल्या. या योजनेसाठी सरकारनं जाचक नियम आणि
अटी घातल्यानं अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
****
राज्य
सरकारनं पिक विमा भरण्यासाठी सुरू केलेलं केंद्र इंटरनेट जोडणीअभावी बंद पडल्यामुळे
तसंच बँकांनी विम्याचा हप्ता घेण्यास नकार दिल्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर
इथं दोन हजार शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी
पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. नांदेड शहरातल्या जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेतही शेतकऱ्यांनी शाखा व्यवस्थापकाला घेराव घातला. ३१ जुलै ही
विमा भरण्याची शेवटची तारीख आहे
****
तामिळनाडूमधल्या
रामेश्वरम इथं उभारण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचं
उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं
उभारलेल्या या स्मारकात डॉ. कलाम यांच्याशी संबंधित वस्तू, चित्रप्रदर्शन आहे. या स्मारकात
उभारण्यात आलेल्या कलाम यांच्या पुतळ्याचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात
आलं. कलाम सारखं व्यक्तिमत्व देशाला दिल्यामुळे रामेश्वरम ही पवित्र भूमि असल्याचं
पंतप्रधान सभेला संबोधित करताना म्हणाले.
****
नांदेडच्या
वनपरिक्षेत्र अधिकारी शामला एखंडे यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात
अटक करण्यात आली. रोपवाटिकेच्या थकित किरायाचा धनादेश देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली
होती.
****
औरंगाबाद
शहरातल्या चिकलठाणा इथलं जिल्हा रुग्णालय ३० नोव्हेंबरपूर्वी कार्यान्वित करण्याचे
आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. या रुग्णालयासंदर्भात
घेण्यात आलेल्या बैठका आणि घोषणांवर न्यायालयानं असमाधान व्यक्त केलं. रुग्णालयासाठी
आवश्यक रुग्णवाहीका, इतर साधने, तसंच कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे रुग्णालयाचं कामकाज
कसं चालवणार, असा सवालही न्यायालयानं केला आहे.
****
भारत
आणि श्रीलंकेदरम्यान गॉल इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या
दिवसअखेर श्रीलंकेच्या पाच बाद १५४ धावा झाल्या. भारताच्या मोहम्मद शमीनं दोन, तर उमेश
यादव आणि आर.अश्विननं प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव ६०० धावांवर
संपुष्टात आला. यामध्ये चेतेश्वर पुजारा १५३, अजिंक्य रहाणे ५७, हार्दिक पंड्यानं ५०
तर रविचंद्रन अश्विननं ४७ धावा केल्या.
****
No comments:
Post a Comment