आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ फेब्रुवारी २०१८ सकाळी ११.००
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात
येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात
झाली. राज्यातल्या दोन हजार ८२२ परीक्षा केंद्रांमधून
१४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी ही परीक्षा
देत आहेत. या परीक्षा येत्या वीस मार्चपर्यंत चालणार आहेत.
****
पीएनबी घोटाळा
प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं या बँकेच्या जनरल मॅनेजर श्रेणीच्या एका अधिकाऱ्याला
अटक केली आहे. राजेश जिंदल असं या अधिकाऱ्याचं नाव असून, ते २००९ ते २०११ या कालावधीत
या बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेचे प्रमुख होते. विभागानं या प्रकरणी नीरव मोदी आणि मेहुल
चोक्सी यांच्या कंपन्यांच्या काही अधिकाऱ्यांनाही अटक केली. यामध्ये नीरव मोदीच्या
फायर स्टार कंपनीचा मुख्य वित्तीय अधिकारी विपुल अंबानीचाही समावेश आहे.
****
रोटोमॅक पेन
उद्योजक विक्रम कोठारी यांना केंद्रीय अन्वेषण विभागानं ताब्यात घेतलं आहे. बँक ऑफ
बडोदाच्या तक्रारीवरून विक्रम कोठारी, त्यांचे काही कुटुंबीय आणि कंपनीच्या तीन संचालकांवर
विभागानं गुन्हा दाखल केला आहे. कोठारीच्या कंपनीनं सरकारी बँकांसहित सात बँकांची तीन
हजार सहाशे पंचाण्णव कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कोठारी कुटुंबियांना
देश सोडून जाता येऊ नये यासाठी सक्त वसुली संचालनालयानं देशाबाहेर जाण्याच्या सर्व
मार्गांना सूचित केलं आहे.
****
नाशिक-पुणे
महामार्गावर नाशिक जिल्ह्यात मनेगाव फाटा इथे वऱ्हाडाचा टेम्पो आणि ट्रकची समोरासमोर
धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार आणि अन्य एकवीस जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. काल संध्याकाळी हा अपघात
झाला. जखमींना नाशिकच्या शासकीय तसंच खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे
.
****
बल्गेरियातल्या
सोफिया इथे सुरू असलेल्या एकोणसत्तराव्या स्ट्रांजा मेमोरियल मुष्टीयुद्ध स्पर्धेत
भारताच्या स्वीटी बूरा आणि मीना कुमार देवी यांनी आपापल्या गटाच्या उपान्त्य फेरीत
प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. स्वीटी बुरा माजी विश्व रौप्यपदक विजेती आहे.
*****
***
No comments:
Post a Comment