आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
1 मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा
५८ वा वर्धापन दिन आज सर्वत्र साजरा होत आहे.
औरंगाबाद इथं पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर पालकमंत्री डॉ.दीपक
सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी,
संचलनाचं निरीक्षण केलं.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते
२२ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांची सन्मानचिन्हं प्रदान करण्यात
आली. क्रीडापटू, तलाठी तसंच उद्योजकांचाही यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
हुतात्मा जवानांच्या वीरपत्नींना राज्य मार्ग परिवहन – एसटी बससेवेचे
आजीवन मोफत पास वितरित करण्यात आले.
****
जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या
मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्य
शासकीय ध्वजारोहण झालं. जालना जिल्हा निर्मितीला आज ३७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोणीकर
यांनी शुभेच्छा दिल्या.
****
बीड इथं पोलिस मुख्यालयाच्या
मैदानावर ग्रामविकास तथा महिला बालकल्याण मंत्री तसंच जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा
मुंडे यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं.
****
लातूर इथं पोलिस मुख्यालयाच्या
प्रांगणात कौशल्यविकास मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याहस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान
करण्यात आले
****
परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा
गांधी क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं, वीरपत्नींना
एसटीचे मोफत आजीवन पास यावेळी वितरित करण्यात आले
****
हिंगोली शहरात संत नामदेव पोलीस
मैदानावर पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलीस दलातील पदक
प्राप्त आधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
नांदेड इथं जिल्ह्याचे पालकमंत्री
रामदास कदम यांच्या हस्ते तर उस्मानाबाद इथं पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं.
****
लातूर औरंगाबाद शिवशाही बसला
अंबाजोगाई – केज रस्त्यावर होळ जवळ अपघात झाला, या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले, त्यापैकी
पाच जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर अंबाजोगाई इथं स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय
रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment