आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
सकाळी एक दिवसाच्या रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले. ते आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या बरोबर
सोची इथं अनौपचारिक चर्चा करणार आहेत. भारत-रशिया संबंध
अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं आंतरराष्ट्रीय मुद्दयांवर व्यापक चर्चा करण्याची ही
महत्वपूर्ण संधी असून, पुतिन यांच्या बरोबर होणाऱ्या चर्चेमुळे उभय देशांदरम्यान
विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
****
स्थानिक
स्वराज्य संस्थांमधून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी आज
मतदान होत आहे. नाशिक, अमरावती, चंद्रपूर, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद-लातूर-बीड, आणि परभणी-हिंगोली, या
सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. सकाळी आठ वाजता
मतदानाला सुरुवात झाली असून, संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.
****
राज्यातल्या
शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती, मालाला न मिळणार भाव, वाढती बेरोजगारी यावर केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा इथं भंडारा
गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आयोजित सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना आपली प्रगती साधायची असेल तर त्यांना
पीक पद्धतीत बदल करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले
खासदार नाना पटोले यांच्यावरही त्यांनी टीका केली.
****
परभणी जिल्ह्यातल्या सावरगाव इथं जलसंधारणासाठी ग्रामस्थांच्या
महाश्रमदानातून काल दोन बंधारे उभारण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी बी. पृथ्वीराज यांच्यासह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनीही
या श्रमदानात सहभाग
घेतला.
*****
***
No comments:
Post a Comment