आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
फरार हिरे व्यापारी निरव मोदीच्या प्रत्यार्पणाची
मागणी भारत सरकारनं भारतानं इंग्लंडकडे केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं राज्यसभेत
लेखी उत्तराच्या माध्यमातून ही माहिती दिली. इंग्लंडच्या उच्च आयोगाकडे या मागणीचं
पत्र पाठवलं असल्याचं या उत्तरात म्हटलं आहे. पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार कोटी रुपयांचा
गैरव्यवहार केल्याचा नीरव मोदीवर आरोप आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी उज्ज्वला योजना प्रकल्पाचं मोफत
पाच कोटी स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचं उद्दिष्ट आज पूर्ण होणार आहे. संसदेत
होणाऱ्या एका कार्यक्रमात लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या
हस्ते पाच कोटी संख्येचं उद्दीष्ट
पूर्ण करणारी जोडणी लाभार्थ्याला दिली जाईल. आता
आणखी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करून २०२० पर्यंत
आठ कोटी गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी जोडणी देण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात
आलं आहे.
****
देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या
संकल्पनेला रिपब्लिकन पक्षानं पाठिंबा दिला आहे. या संकल्पनेमुळे निवडणुकांसाठी होणारा
प्रचंड खर्च वाचवता येईल, असं पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. काल याबाबतचं पत्रक त्यांनी जारी केलं.
****
प्रगत हवाई सुरक्षा इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची काल ओडिशातल्या
अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. देशी बनावटीच्या या क्षेपणास्त्राची
स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता बाराशे किलोग्रॅम इतकी असून त्याचा पल्ला वीस किलोमीटर
इतका आहे.
****
पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांच्या
नि:शुल्क तपासणीकरिता सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यातल्या ग्रामीण
रुग्णालयात एक विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करुन घेणाऱ्या शेतमजुराला प्रमाणपत्र
देण्यात येईल, जास्तीत जास्त मजुरांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य
विभागाचे अप्पर सचिव विजय कुमार यांनी केलं आहे.
//************//
No comments:
Post a Comment