Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 24
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. आज नवी दिल्लीत
सहाव्या राष्ट्रीय जल सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आघाडीचे उद्योजक,
शेतकरी आणि सरकारी यंत्रणांनी यावर अधिक सक्रीयपणे काम करण्याची गरज राष्ट्रपतींनी
व्यक्त केली. पाणी बचतीकडे आपण कानाडोळा करत असून, आपल्या भावी पिढ्यांना पिण्याकरता
शुद्ध पाणी मिळेल, याची आपणच काळजी घ्यायला हवी, असं राष्ट्रपतींनी नमूद केलं. कमी
पाण्यावर येणारी पिकं घ्यावीत, तसंच उद्योग क्षेत्रातही पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा,
असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं.
****
फौजदारी प्रकरणातल्या
तपासादरम्यान, पोलिसांना अचल संपत्ती जप्त करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं
म्हटलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव
खन्ना यांच्या पीठानं आज झालेल्या सुनावणी दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात
दिलेला निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयानं एका प्रकरणात निर्णय देताना, भारतीय दंडविधानाच्या
कलम १०२ मध्ये पोलिसांना अचल संपत्तीच्या जप्तीचे अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. महाराष्ट्र
सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं
उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
****
लोकसभेच्या सातारा इथल्या रिक्त जागेसाठी येत्या
२१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसोबत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक
आयोगानं आज ही घोषणा केली. मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात एक याचिका प्रलंबित असल्यानं,
आयोगानं या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्याचा निर्णय स्थगित केला होता. काल न्यायालयानं
या संदर्भात आदेश दिल्यानंतर आज ही घोषणा करण्यात आली. उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानं
रिक्त झालेल्या या जागेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून, मतमोजणी २४ ऑक्टोबरलाच
होणार आहे.
****
विधानसभा निवडणुकांवर होणाऱ्या खर्चावर
नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगानं राज्य
सेवेतले निवृत्त अधिकारी मधू महाजन आणि बी मुरली कुमार यांची विशेष व्यय परिवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मधू महाजन हे निवडणुकीत पैशाचा गैरवापर थांबण्याबरोबरच निवडणुकीच्या संचालनावरही लक्ष ठेवणार आहेत. तर मुरली कुमार हे पुण्यात राहून निवडणूक अधिकाऱ्यांशी
समन्वयन आणि या संदभातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. रोकड, दारू आणि वस्तू स्वरूपात मतदारांना प्रलोभनं देणाऱ्यांवर कडक कारवाईचा
इशारा निवडणूक आयोगानं दिला आहे
****
राज्यातल्या सर्व पेट्रोलपंपांवर लागलेली पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं चित्र असलेले फलक काढण्याचे निर्देश देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने
निवडणूक आयोगाकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीची
आचारसंहिता लागू झाली असल्याने, सर्वत्र राजकीय पक्षांचे फलक झाकले जात असताना, पेट्रोल
पंपांवरच्या या फलकांकडे मात्र निवडणूक डोळेझाक करत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते
सचिन सावंत यांनी केली आहे.
****
नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातल्या मानूर ग्रामपंचायतीचे
सदस्य गजेंद्र पंढरीनाथ पवार यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय मालेगावचे
अपर जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. २०१७ साली पवार सदस्य म्हणून निवडून आले होते. निवडणूक
लढवताना तिसरं अपत्य असल्याची माहिती पवार यांनी लपवून ठेवत निवडणुकीत विजयी मिळवला.
त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. चौकशीत गजेंद्र पवार
यांना तीन अपत्य असून, २००५ नंतर दोन अपत्य असल्याचे समोर आलं, त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या
आदेशानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
****
बीड जिल्ह्यात
काल पाली, राजुरी, वडवणी तालुक्यातलं कौडगाव, आष्टी तालुक्यात दौलावडगांव या गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. काल रात्रभर
झालेल्या मुसळधार पावसाने बिंदुसरा धरणं हे ७०टक्के तर माजलगाव धरण ६० टक्के भरलं आहे.
जिल्ह्यात
काल १४० मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला बीड शहराच्या अनेक भागात घरांमध्ये तसंच रस्त्यावर
पाणी साचल्यानं नागरीकांचे दैनंदिन व्यवहार प्रभावित झाले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिेकेच्या
महिला क्रिेकेट संघादरम्यान टी ट्वेंटी मालिकेला आजपासूप सुरुवात होत आहे.
*****
***
No comments:
Post a Comment