Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 21
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र
आणि हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुका एकाच फेरीत म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी होणार असून
मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याचं भारतीय निवडणूक आयोगानं आयुक्त सुनिल
अरोरा यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत निवडणुक कार्यक्रमाची घोषणा करताना बोलत
होते. या कार्यक्रमानुसार २७ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून उमेदवारी
अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर आहे. पाच ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात
येणार असून ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. महाराष्ट्रात एक लाख ८० हजार
तर हरियाणात एक लाख ३० हजार ईव्हीएम यंत्रांच्या सहाय्याने मतदान घेण्यात येणार आहे.
आयोगानं उमेदवारांना २८ लाख रुपये एवढी खर्चाची मर्यादा देखील ठरवून देण्यात आली आहे.
या दोन्ही राज्यासांठी आदर्श आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत नऊ नोव्हेंबर रोजी तर
हरियाणा विधानसभेची मुदत २ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे दोन नोव्हेंबरपूर्वी
दोन्ही राज्यातील निवडणुका आटोपल्या जातील, असं अरोरा यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात
विधानसभेच्या २८८ तर हरियानात ९० जागांसाठी या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात
आठ कोटी ९४ लाख मतदार असून हरियाणात एक कोटी ८२ लाख मतदार आहेत. महाराष्ट्रात उमेदवारांच्या
खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांनी
उमेदवारी अर्जात एकही कॉलम रिकामा ठेवल्यास त्याची उमेदवारी बाद ठरेल, असंही अरोरा
यांनी यावेळी सांगितलं. नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये सुरक्षेची
विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सात दिवसांच्या अमेरिकेच्या
दौऱ्यावर रवाना झालेले आहेत. या दौऱ्यावेळी
ते संयुक्त राष्ट्र सभेच्या सर्वसाधारण सभेसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे.
अमेरिकाला जात असताना ते आज सकाळी काही वेळ फ्रॅन्कफर्टला थांबले. या वेळी संयुक्त
सभेच्या सर्वसाधारण सभेच्या रुपरेषेत गरिबी निर्मुलनासाठी प्रयत्नांत वाढ करणे, शिक्षणाचा
दर्जा सुधारणे, हवामान बदल रोखण्यासाठी प्रयत्न यासांरख्या विषयांवर चर्चा करण्यात
येणार आहे. सर्वांगिण आणि सर्वांच्या विकासासाठी भारत प्रतिबद्ध असल्याचा पंतप्रधान
मोदी यांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सभेत शाश्वत
विकास साध्य करण्यामध्ये देशानं मिळवलेले यश दाखवण्यासाठी भारताला संधी असल्याचंही
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. उद्या ते होस्टनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करणार
आहेत. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील भारतीय समुदायाला संबोधित करणार
असून पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष भारतीय समुदायाला संबोधित करणार असल्याचं ते म्हणाले.
ते होस्टनमध्ये अनेक ऊर्जा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून
भारतात गुंतवणुकीसाठी प्रयत्न करणार आहेत
महात्मा गांधी
यांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रानं येत्या मंगळवारी आयोजित केलेल्या
सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. ५० किलोवॅट क्षमतेच्या गांधी सौर प्रकल्पाचं आणि
गांधी शांती उद्यानाचं उद्घाटन यावेळी त्यांच्या हस्ते होणार आहे. देशात स्वच्छ भारत
अभियान सुरु करून स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण केल्याबद्दल मोदी यांना ग्लोबल गोलकीपर
पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.
****
भारतीय उद्योगांनी आणि व्यापाऱ्यांनी कॉर्पोरेट करात दहा टक्के कपात करण्याच्या निर्णयाचे
स्वागत केले असून यामुळे उद्योग जगताला नवी उभारी मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.
सध्याच्या आर्थिक मंदीच्या वातावरणात पुन्हा विकास दर साध्य करण्यासाठी या निर्णयाचा
मोठा फायदा होईल, असं भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ अर्थात फिक्कीनं म्हटलं आहे.
असोचॅमचे अध्यक्ष संदीप सोमाणी यांनी या घोषणेचं स्वागत करताना करात कपात करण्याची
अनेक दिवसांपासूनची मागणी असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील
कर कपातीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. यामुळे देशाच्या मेक इन इंडिया या
मोहिमेला मोठी चालना मिळेल, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या कर कपाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
देखील स्वागत केलं आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र या सुधारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीमारामन् यांचे आभार मानत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment