आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४
सप्टेंबर २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभेच्या सातारा इथल्या
रिक्त जागेसाठी येत्या २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसोबत पोटनिवडणूक घेतली जाणार
आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज ही घोषणा केली. मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात
एक याचिका प्रलंबित असल्यानं, आयोगानं या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्याचा निर्णय
स्थगित केला होता. काल न्यायालयानं या संदर्भात आदेश दिल्यानंतर आज ही घोषणा करण्यात
आली. उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या या जागेसाठी २१ ऑक्टोबरला
मतदान होणार असून, मतमोजणी २४ ऑक्टोबरलाच होणार आहे.
****
विधानसभा निवडणुकांवर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण
ठेवण्यासाठी निवडणूक आयोगानं राज्य सेवेतले
निवृत्त अधिकारी मधू महाजन आणि बी मुरली कुमार
यांची विशेष व्यय परिवेक्षक म्हणून नियुक्ती
केली आहे. मधू महाजन हे निवडणुकीत पैशाचा गैरवापर थांबण्याबरोबरच निवडणुकीच्या संचालनावरही लक्ष ठेवणार आहेत. तर मुरली कुमार हे पुण्यात राहून निवडणूक अधिकाऱ्यांशी
समन्वयन आणि या संदभातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. रोकड, दारू आणि वस्तू स्वरूपात मतदारांना
प्रलोभनं देणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा निवडणूक आयोगानं
दिला आहे
****
राज्यातल्या सर्व पेट्रोलपंपांवर लागलेली पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं चित्र असलेले फलक काढण्याचे निर्देश देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने
निवडणूक आयोगाकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीची
आचारसंहिता लागू झाली असल्याने, सर्वत्र राजकीय पक्षांचे फलक झाकले जात असताना, पेट्रोल
पंपांवरच्या या फलकांकडे मात्र निवडणूक डोळेझाक करत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते
सचिन सावंत यांनी केली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या सातपूर इथं एका बँकेचं एटीएम
फोडून पळणाऱ्या पाच संशयित आरोपींपैकी दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या
पाच जणांनी बँकेचे एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र सदरची घटना रस्त्याने
ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळवली,
त्यामुळे या चोरट्यांनी पळ काढला होता.
*****
***
No comments:
Post a Comment