आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० सप्टेंबर २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
भारताकडून जगाच्या मोठ्या अपेक्षा असल्याचं, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज चेन्नईत एका कार्यक्रमात बोलत होते. संपूर्ण
जगाला लाभ होईल, अशा उत्कर्षाच्या मार्गावर देशाला नेण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं
पंतप्रधानांनी सांगितलं. अन्य एका कार्यक्रमात चेन्नई सिंगापूर हॅकेथॉन मधल्या विजेत्यांनाही
पंतप्रधानांनी पुरस्कार प्रदान केले.
****
महाराष्ट्र आणि हरियाणात
येत्या २१ऑक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची नावं
निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या
केंद्रीय निवडणूक समितीची काल दिल्ली इथं पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी,
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित
होते.
****
ज्येष्ठ अभिनेते
विजू खोटे यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांसह
मराठी आणि इंग्रजी रंगभूमीवर त्यांनी विविध भूमिका साकारल्या. शोले या चित्रपटातली
कालिया डाकूची भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज
मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
भारताचा बॅडमिंटनपटू
कौशल धर्मामेर यानं मालदिवची राजधानी माले इथं झालेल्या मालदिव आंतरराष्ट्रीय बॅडमिन
स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात कौशलनं सिरील
वर्माचा सरळ सेटमध्ये पराभव केला. मात्र महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की
रेड्डी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यांना जपानच्या सायाक होबारा
आणि नात्सुकी सोनी या जोडीनं १०-२१, २१-१७, १२-२१ असं हरवलं. मिश्र दुहेरीत साईप्रतिक
कृष्णप्रसाद आणि अश्विनी भट या जोडीला, तसंच पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज आणि सन्याम शुक्ला
या जोडीलाही उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं.
*****
***
No comments:
Post a Comment