Friday, 27 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.09.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७  सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य विधानसभा निवडणुकीकरता आजपासून चार ऑक्टोरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. पाच ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून सात ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागं घेता येणार आहेत. एकवीस ऑक्टोबरला मतदान तर चोवीस ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
****
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ते आज दुपारी मुंबईत सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पक्ष ार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालय परीसरात जमा होऊ नये, असं आवाहन पवार यांनी केलं आहे. ात्र ईडीनं आतापर्यंत पवार किंवा अन्य कोणालाही या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलेलं नसल्याचं स्पष्ट केलं असून पोलिसांनी ईडी कार्यालयाच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. 
****
औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव येत्या एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान विद्यापीठ परिसरात होणार आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.
***
कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. कश्यपनं पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण कोरियात इंचिऑन इथं सुरू असलेल्या य स्पर्धेत कश्यपनं काल मलेशियाच्या डॅरेन ल्यू याचा २१-१७, ११-२१, २१-१२ असा पराभव केला.
****
सातारा जिल्यातील जोरदार पावसामु्ळ सांगली जिल्हातील आटपाडी तालुक्याला दिलासा मिळाला आहे. मागील पंधरा वर्षात प्रथमच आटपाडी तालुक्यात पर आला आहे. खानापर तालुक्यातील सुलतानगादे धरण शंभर टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना  मोठा फटका बसला आहे.  इगतपुरी,  पेठ, त्र्यंबक आणि सुरगाणा इथं भात आणि नागलीची पिकं  धोक्यात आली आहेत. अनेक तालुक्यांत बाजरी, मका आणि कांद्याची पिकं खराब झाली आहेत. काढणीवर आलेल्या भाता बरोबरच हंगाम पूर्व द्राक्ष पिकांना देखील पावसाचा फटका बसला आहे. आद्रता वाढणार असल्यानं चाळीतील कांदा पिकं सडण्याची भीती कृषी खात्यानं व्यक्त केली आहे.
****


No comments: