Saturday, 7 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.09.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ सप्टेंबर २०१ दुपारी .०० वा.
****

 मुंबईतल्या विकास कामांमुळे मुंबईच्या विकासाला आणि पर्यायाला देशाच्या विकासालाही नवी दिशा मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईतल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कामांचा शुभारंभ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केला. यावेळी नागरिकांना त्यांनी गणेशत्सोवाच्या शुभेच्छाही दिल्या. तत्पूर्वी सकाळी आगमन झाल्यावर मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बनडोंगरी-कांदिवली पूर्व या मेट्रो स्थानक, बीकेसीतल्या मेक इन इंडियाअंतर्गत बनवलेल्या आधुनिक मेट्रो कोच आणि बीकेसी-चुनाभट्टी फ्लायओव्हरचं उद्धाटन केलं. मुंबईत तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आली. यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयलही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी देखील यावेळी विचार मांडले.
दरम्यान, औरंगाबाद इथं दुपारी दोन वाजेच्या सुमारास पंतप्रधानांचं आगमन होणार आहे. औरंगाबाद औद्योगिक नगरी - ऑरिक सिटीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पणही आणि ऑरिक हॉलचं उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत राज्यस्तरीय सक्षम महिला बचत गटाच्या मेळाव्यालाही पंतप्रधान यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
****

 चंद्रावर उतरण्यापूर्वीच काही मिनीटे अगोदर चांद्रयान-दोनच्या विक्रम या लँडरचा भारतीय अंतराळ संशोधन संघटना- इस्त्रोच्या बंगळूरू इथल्या नियंत्रण केंद्राशी संपर्क खंडीत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इस्रोमधून संबोधित केलं. शास्रज्ञ हे लोक केवळ देशासाठी जगत असतात आणि त्यांचे संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित करतात, या शब्दात त्यांनी शास्रज्ञांचा गौरव केला. देशाच्या वैभवशाली इतिहासात असे अनेक उतार चढाव आले; मात्र त्यामुळे देशाचे धैर्य कधी संपले नसल्याचंही ते म्हणाले.
****

 सर्व खासदारांनी आपापल्या मतदार संघात ’तंदुरुस्त भारत अभियान’ सुरू करावी, असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. संसद भवनात काल या मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारत प्रगत देश व्हावा, हे स्वप्न आहे. मात्र, देशाचा प्रत्येक नागरिक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी असेल तरच ते स्वप्न साकार होईल, असं युवक कल्याण आणि क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी यावेळी सांगितलं.
****

 नवी दिल्लीत आजपासून सहाव्या भारत-चीन धोरणात्मक आर्थिक चर्चेला सुरुवात होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पायाभूत सुविधा, ऊर्जा, उच्चतंत्रज्ञान, संसाधन संरक्षण, औषधं आणि धोरण समन्वयावरील संयुक्त कृती गटाच्या गोलमेज बैठका होणार आहेत. भारताचं प्रतिनिधित्व नीति आयोगाचे उपाध्यक्ष करतील तर, चीनचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे अध्यक्ष करतील.
****

 वन आणि वन्यजीव संवर्धन आणि संरक्षणामध्ये व्यापक लोकसहभाग वाढवण्याबरोबर वन विभागाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्याची यशस्विता वाढवण्यासाठी वन विभागानं आता थेट भेटीतून "लोकसंवाद" साधण्याचं निश्चित केले आहे. यासाठी चालू वर्षाच्या उर्वरित कालावधीकरता सत्तर लाख रुपये तरतूद करण्यात आल्याची माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी काल मुंबई दिली. राज्यातल्या ३५८ तालुक्यात दर सहा महिन्यांनी लोकसंवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं वन विभागानं निश्चित केलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.  
****

 सांगली जिल्ह्यात मोक्का न्यायालय सुरु करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आला आहे. सांगली कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, अशा खटल्यांची सुनावणी सध्या पुण्यातल्या मोक्का न्यायालयात केली जाते. त्यामुळे संबंधितांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सांगलीत हे न्यायालय सुरू करण्यासाठी पावलं उचलली जात आहे.
****

 पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी लातूर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या सहाही मतदार संघावर भाजपाचा झेंडा फडकवण्याचं आवाहन केलं आहे. सहा ही मतदारसंघातल्या इच्छुकांच्या लोणीकर यांनी काल मुलाखती घेतल्या, त्यावेळी त्यांनी उपस्थितांना हे आवाहन केलं. जिल्ह्यातून एकूण एकशे अकरा जण भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
*****
***

No comments: