Sunday, 8 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०८ सप्टेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****

v  औरंगाबाद औद्योगिक नगरीच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण;  महिलांच्या नेतृत्वात राष्ट्र कल्याणाचा सरकारचा निर्धार - नरेंद्र मोदी
v   मुंबईत १९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या तीन मेट्रोमार्गांची पायाभरणी
v नागरिकांना नियम पालनाची सवय लागावी यासाठी वाहतूक कायदा अधिक कठोर- परिवहन मंत्री नितीन गडकरी
आणि
v पैसे घेतानाची वादग्रस्त चित्रफीत प्रसारीत झाल्यानंतर त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वि.ल. धारुरकर यांचा राजीनामा
****

 औरंगाबाद औद्योगिक नगरी - ऑरिक सिटीच्या पहिल्या टप्प्याचं, तसंच सुसज्ज ऑरिक सभागृहाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल औरंगाबाद इथं उद्घाटन केलं. याचवेळी त्यांनी पंतप्रधान उज्जवला गॅस योजनेअंतर्गत आठ कोटी क्रमांकाच्या गॅस कनेक्शनचं वितरण केलं तसंच राज्यस्तरीय सक्षम महिला बचत गटाच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून उपस्थित महिलांशी संवाद साधला.

 दिल्ली - मुंबई औद्योगिक मार्गिका प्रकल्पामुळे औरंगाबाद शहर हे देशभरातल्या औद्योगिक घडामोडींचा केंद्रबिंदू ठरत असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले...

 औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी की सिग्नेचर बिल्डींग अब सेवा के लिए तयार है. औरंगाबाद नया स्मार्ट सिटी तो बन ही रहा है, देश की औद्योगिक गती-विधीयों का भी बडा सेंटर होने वाला है. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर का भी एक अहम हिस्सा है. अनेक बडी कंपनीया यहां काम करना शुरू कर चुकी है. आनेवाले समये में और कंपनियां भी यहां पे आऐगी यह कंपनीयां यहां के लाखों युवाओंको रोजगार के नये अवसर देने वाली है.

 उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आठ कोटी क्रमांकाची गॅसजोडणी पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थी महिलेला प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आली. निर्धारित मुदत पूर्ण होण्याच्या सात महिने आधीच हा टप्पा गाठल्याबद्दल, पंतप्रधानांनी लाभार्थी महिलांना शुभेच्छा दिल्या. देशात एकही कुटुंब स्वयंपाकाच्या गॅसपासून वंचित राहून नये, या साठी प्रयत्न सुरु असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पाँच करोड गॅस कनेक्शन मुफ्त देने का लक्ष्य रखा गया. पिछले साल मार्च में इस लक्ष्य को विस्तार देते हुए, आठ करोड कर दिया गया. इस सरकार बननेके सौ दिन के भीतर ही यह काम पुरा हो गया. तय समय से सात महिने पहिले ही लक्ष्य को हमने पा लिया. इन आठ करोड कनेक्शन में से करिब 44 लाख अकेले महाराष्ट्र में दिए गए.

 पुढच्या पाच वर्षांत साडे तीन लाख कोटी रुपये जल जीवन अभियानावर खर्च करून, घरोघरी पेयजल पोहोचवणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले…

जल जीवन मिशन की शुरूआत की गई है. इस मिशन के तहत पानी बचाने के लिए घर घर पानी पोहचाने के लिए,  पुरा देश संकल्प बध्द हुआ है. यह तय किया गया है की आनेवाले पांच वर्ष में लगभग साडेतीन लाख करोड रूपये इस पानी के अभियानपर खर्च किए जाएंगे.

 महिलांच्या नेतृत्वात राष्ट्र कल्याणाचा निर्धार सरकारनं केला असल्याचं सांगतानाच, महिला बचत गट सदस्यांसाठी पाच हजार रुपये ओव्हरड्राफ्ट आणि स्वयंसहायता बचत गटाच्या एका सदस्याला मुद्रा योजनेअंतर्गत एक लाख रुपये कर्जाचा विशेष लाभ देण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

महिला स्व- सहाय्यता के लिए समूह की जिन सदस्यों के पास जनधन बँक खाता है. उनको पांच हजार रूपयों तक के ओव्हर ड्राफ्ट की अतिरिक्त सुविधा मिलेगी अब किसी सावकार से ज्यादा ब्याज से पैसा नहीं लेना पडेगा. मुद्रा योजना के तहतभी हर स्व सहाय्यता समुह की एक महिला सदस्य को एक लाख रूपये तक का कर्ज मिलेगा. इससे आपको आपका कारोबार शुरू करने या फिर उसे बढाने में मदत मिलेगी.

 मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा गौरवपूर्ण उल्लेख करत, यामुळे मराठवाड्यातला दुष्काळ दूर होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. महिला बचत गट प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट देऊन, महिलांनी तयार केलेल्या वस्तू तसंच वस्त्रांचं कौतुक केलं.

 या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****

 मुंबईत काल १९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या तीन मेट्रोमार्गांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. याचबरोबर ३२ मजली आणि  ३४० किलोमीटर लांबीच्या १४ मेट्रोमार्गांचं नियंत्रण करू शकणाऱ्या अत्याधुनिक मेट्रो भवनाचं भूमिपूजन,  मेक इन इंडिया कार्यक्रमा अंतर्गत तयार झालेल्या मेट्रोच्या डब्याचं आणि कांदिवलीजवळ बाणडोंगरी इथल्या नवीन मेट्रो स्थानकाचं उद्घाटनही मोदी यांनी केलं. देशभरात मेट्रोचं जाळं वाढवण्याचं काम गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त वेगाने झाल्याचा दावा पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना केला.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

 नागरिकांना नियमांचं पालन करण्याची सवय लागावी, यासाठी नवीन वाहतूक नियम अधिक कठोर बनवले असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. आयुष्य आणि पैसा यापैकी काय महत्वाचं आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. काही नागरिक वाहतूक नियमांचं गंभीरतेनं पालन करत नाहीत, आणि कमी दंड भरुन सुटतात, त्यामुळे हे नियम बदलणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीवर पैसे घेतानाची वादग्रस्त चित्रफीत प्रसारीत झाल्यानंतर काल त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वि.ल. धारुरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. धारुरकर यांनी कोलकाताच्या छपाई कामाच्या कंत्राटदाराकडून पाच लाख ८० हजार रुपये घेतल्याचे पुरावे असल्याचं न्यूज वांगार्ड या वाहिनीचे संचालक सेबाक भट्टाचार्य यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
****

 अल्पसंख्याक विकास विभाग, मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ आणि उर्दु अकादमीच्यावतीनं आज औरंगाबाद इथं उर्दु साहित्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी उर्दु मुशायराचं आयोजनही करण्यात आलं आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाचे राज्यमंत्री तसंच उर्दु अकादमीचे उपाध्यक्ष अतुल सावे यांनी ही माहिती दिली.
****

 कवी बी. रघुनाथ यांच्या स्मृती दिनानिमित्तानं परभणी महापालिकेत त्यांना काल अभिवादन करण्यात आलं. वसमत रस्त्यावर बी. रघुनाथ यांच्या अर्धाकृती पुतळ्याला महापौर मिनाताई वरपुडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****

 परभणी जिल्ह्यातल्या चारठाणा इथल्या प्रामिक आरोग्य केंद्राच्या कोटी रुपयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि विविध विकास कामांसाठी ९१ लाख रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते काल झालं.
****

 पुण्याच्या मराठवाडा समन्वय समितीच्या वतीनं दिला जाणारा कृषी क्षेत्रातल्या योगदानासाठीचा मराठवाडा भूषण पुरस्कार जालना जिल्ह्यातले गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांना जाहीर झाला आहे. डॉ. कापसे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करुन कृषी क्षेत्राला वेगळी उंची प्राप्त करुन दिली आहे.
*****
***

No comments: