आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०८ सप्टेंबर २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
देशाचे माजी कायदेमंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम
जेठमलानी यांचं आज सकाळी नवी दिल्ली इथं निधन झालं, ते ९५ वर्षाचे होते. गेल्या काही
दिवसांपासून आजारी असलेल्या जेठमलानी यांनी राष्ट्रीय जनता दलाकडून राज्यसभेचं खासदारपदही
भूषवलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह यांनी ट्विटर संदेशातून जेठमलानी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी
पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरण परिसरात सुरू
असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी ३७ फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी
धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुन्हा धोक्याचा
इशारा देण्यात आला आहे.
कोयना आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रातही
कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे
आठ फुटापर्यंत उघडण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या महिन्यात निर्माण
झालेली भीषण पूर परिस्थिती लक्षात घेता, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे आलेल्या पुरात अनेक ठिकाणी
रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कित्येक गावांशी संपर्क तुटला असून, एक जण पुरात
वाहून गेल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गोसी खुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात
आल्यानं वैनगंगेला मोठा पूर आला आहे.
****
औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत असलेल्या राजाबाजार येथील संस्थान गणपती परिसरात आज
सकाळी हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी आणि रफत
कुरेशी यांनी स्टेट चित्रपटगृह, संस्थान गणपती आणि जाधवमंडी परिसराच्या इतिहासाची आणि
ऐतिहासिक वास्तूंची माहिती दिली. यावेळी शहरातील इतिहास अभ्यासक आणि नागरिक मोठ्या
संख्येनं उपस्थित होते.
*****
***
No comments:
Post a Comment