Thursday, 21 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.11.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

शिवसेनेसोबत आघाडी करायला काँग्रेस कार्यकारी समितीनं मान्यता दिली आहे. या संदर्भातील निर्णय उद्या घेण्यात येणार असल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.
****

 राज्यात सरकार स्थापनेसंदर्भातील अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत घेण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात या आठवड्यात कोणत्याही बैठकीचं नियोजन नसल्याची माहितीही राऊत यांनी यावेळी दिली.
****

 राष्ट्रवादी काँग्रेस क्षांच्या नेत्यांचीही नवी दिल्लीत एक बैठक सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. 
****

              पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं असून, येत्या तीन वर्षात सात लाख घरांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संकल्प करण्याचं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. मुंबईत काल आवास दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक घरात शौचालय योजनेप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सन २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवण्याची योजना सुरू करणार आहेत. ही योजना नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावेत, असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं.
****
 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या युवक महोत्सवाचं उद्घाटन प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होत आहे. विद्यापीठाशी संलग्न सुमारे दोनशे महाविद्यालयांचे संघ आणि तीन हजार कलावंत या युवक महोत्सवात सहभागी होत आहेत.
*****
***

No comments: