Sunday, 5 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

स्वच्छ भारत अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला बचत गटांचा येत्या आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी सत्कार करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयानं याबाबत सर्व राज्य सरकारांना पत्र लिहून अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यास सांगितलं आहे. स्वच्छतेविषयी महिलांमध्ये जागृती होण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे.   

****

अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांवरील हल्ल्यांचं सत्र सुरूच असून, आज वॉशिंग्टन राज्यातील केंट भागात एका बुरखाधारी व्यक्तीनं दीप राय या शीख तरुणावर गोळीबार केला. या हल्ल्यात हा तरुण जखमी झाला आहे. गोळीबार करताना हल्लेखोराने या तरुणाला मायदेशात परत जा, अशी धमकी दिल्याचं समोर आलं आहे. याआधी कॅनसस शहरात भारतीय अभियंता श्रीनिवास कुचीभोट आणि  हरनिश पटेल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

****

विशेष प्राधान्याने देण्यात येणाऱ्या एच-१बी व्हिसा ची प्रीमिय प्रक्रिया तीन एप्रिलपासून काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. या योजनेत काही कंपन्यांना व्हिसा रांगेत यावे लागतप्राधान्यानं व्हिसा मिळतो. हा व्हिसा भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांत विशेष लोकप्रिय आहे. या प्राधान्य प्रक्रियेलाच आता स्थगिती देण्यात येत असल्याचं अमेरिकेच्या नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवा विभागानं सांगितलं आहे. ही स्थगिती सहा महिन्यांसाठी असू शकते. या काळात केवळ प्रलंबित व्हिसा अर्जांवर निर्णय घेण्यात येणार आहे.

****

राज्य सरकारनं २०१६-१७ या वर्षासाठी अर्थसंकल्पात विविध विकास कामांसाठी केलेल्या आर्थिक तरतुदींपैकी केवळ ४५ टक्केच प्रत्यक्ष खर्च केल्याचं आर्थिक विभागानं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. अर्थसंकल्पातील सुमारे तीन लाख कोटींच्या तरतुदींपैकी केवळ दोन लाख कोटी रुपयेच विकासकामांसाठी उपलब्ध झाले असून, त्यापैकी एक लाख ३८ हजार कोटी रुपयेच विविध योजनांवर खर्च झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं.

****

राज्य सरकारनं महाराष्ट्र शहर टॅक्सी अधिनियम २०१७ लागू करण्याचा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. मुंबई इथं ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यातल्या प्रवाशांना किफायतशीर, तसंच सुरक्षित प्रवासाची साधनं उपलब्ध करुन देणं आवश्यक असल्यानं, संकेतस्थळ आधारित टॅक्सी सेवेचं नियमन करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. प्रवासी भाड्याची कमाल आणि किमान मर्यादा शासनाकडून निश्चित केली जाणार असून, लहान टॅक्सी, मध्यम आरामदायक आणि मोठ्या टॅक्सीसाठी दर आकारणी वेगळी असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

पुण्यात शास्त्रज्ञांच्या एका गटाला मोबाईल फोनवर वाढणारे दोन जीवाणू, तसंच बुरशीच्या एका नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सचे शास्त्रज्ञ डॉकट योगेश शौचे आणि त्यांचे सहकारी मोबाईल फोनवर आढळणाऱ्या जीवाणूंचा अभ्यास करत असताना, त्यांना जीवाणू तसंच बुरशीच्या या दोन नवीन प्रजाती आढळल्या. २७ मोबाईल फोनच्या निरीक्षणात या गटाला मोबाईलवर साचणारी धूळ आणि घाम यामध्ये विविध प्रकारचे सुमारे ५१५ जीवणू आणि २८ बुरशी आढळून आल्याच, याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे.

****

महिला उद्योजकांना अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन लवकरच महिला उद्योग धोरण राबवणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. मुंबई इथं जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित आम्ही उद्योगिनी' पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. उद्योग उभारणीसाठी भांडवल, एम आय डी सी मध्ये महिला उद्योजकांसाठी राखीव भूखंड, कमी व्याजदरानं कर्जपुरवठा अशा विविध सूचना शासनाला प्राप्त झाल्या असून, यावर विचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातील लोककलेचं जतन करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराचं वितरण तावडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. लोककलेचं जतन करण्याचं काम राज्य सरकारनं हाती घेतलेलं काम, आता जवळ जवळ ६५ टक्के पूर्ण झाल्याचं ते म्हणाले.

****

राज्य शासनाच्या पणन महासंघातर्फे शेतमाल आणि बचत गटांच्या उत्पादनांची विक्री व्यवस्था राबवली जाईल, असं सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. ते सोलापूर इथं एका कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. राज्यात आतापर्यंत १८ लाख क्विंटल तुरीची खरेदी केल्याची माहिती त्यांनी दिली.

****

ज्येष्ठ विचारवंत कृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी हल्लेखोर प्रीतम पाटील याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. तसंच त्याची आई मंगला पाटील हिलाही पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सहआरोपी करण्यात आलं आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि पोलिस अधिक्षक महादेव तांबडे यांनी ही माहिती दिली.

//*******//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...