Thursday, 20 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 20.07.2017 10.00






आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२० जुलै २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. सकाळी अकरा वाजता या मतमोजणीला प्रारंभ होणार असून सर्वप्रथम संसद भवनात झालेल्या मतदानाची मोजणी केली जाईल, त्यांनतर राज्यांकडून प्राप्त झालेल्या मतपेट्यांमधल्या मतांची मोजणी केली जाईल.

****

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधला सरकारचा हिस्सा तेल आणि भूगर्भ वायू महामंडळाला विकण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामुळे ३० हजार कोटी रुपये सरकारला मिळणार आहेत. या अधिग्रहणानंतर एचपीसीएल ही ओएनजीसीची एक उपकंपनी बनेल.

****

व्यक्तिगत गोपनियतेचा अधिकार हा घटनात्मक अधिकार आहे का, यावर सर्वोच्च न्यायालयात काल सरन्याधीश जे.एस.खेहर यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधिशांच्या घटनापीठासमोर सुनावणीला सुरूवात झाली. गोपनीयतेच्या अधिकारापुरतीच सुनावणी या पीठासमोर होणार आहे, तर आधार कार्डांच्या अनिवार्यतेसंबधीची सुनावणी दुसऱ्या लहान पीठासमोर होणार आहे. गोपनियतेचा अधिकार हा सर्वस्वी अधिकार होऊ शकत नाही, आणि सरकारला त्यावर व्यवहार्य निर्बंध घालण्याचा थोडा अधिकार असू शकतो, असं मत न्यायालयानं यावेळी व्यक्त केलं.

*****

परभणी जिल्ह्यात काल दुपारी सेलू ते औरंगाबाद रस्त्यावर रिक्षा आणि कार यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

तर अन्य एका घटनेत, अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावर काल संध्याकाळी खडका फाटा इथं कार आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला.

****

पिक विमा योजनेच्या उत्तम अंमलबजावणीसाठी राज्यांना स्वतःच्या विमा योजना कंपन्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं. लोकसभेतल्या शेतीविषयक प्रश्नांवरच्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

****



ऊसाचं क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याच्या निर्णयाची पारदर्शकता सरकारनं समोर आणावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते काल शिर्डी तालुक्यात ममदापूर इथं विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

****


No comments: