आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
तंबाखूजन्य उत्पादनांचा अवैध व्यापार रोखण्यासंदर्भातल्या
जागतिक आरोग्य संघटना -डब्लु एच ओ च्या तंबाखु नियंत्रण विषयक मसुद्याल्या केंद्रीय
मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. अशा पदार्थांच्या निर्मितीसाठीची परवानगी, उत्पादन
यंत्रणा, संबंधीत यंत्रणेद्वारे पाठपुरावा आणि विविध उपाययोजना अदिंचा यात समावेश आहे.
याद्वारे तंबाखू उत्पादनांच्या बनावट, छुप्या आणि अयोग्य व्यापाराविरोधात कारवाई करण्यात
येणार आहे. या मसुद्यामुळे व्यापक तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अधिक बळकट होईल, तसंच
तंबाखूच्या वापराशी निगडित रोग आणि मृत्युदर कमी होईल असा यामागचा उद्देश आहे.
****
लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या लोदगा इथं काल
समृध्द शेतकरी अभियानाअंतर्गत किसान कल्याण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी तज्ञ संशोधकांनी
पशुपालक शेतकऱ्यांना, पशुधन आणि दुध उत्पादन वाढीसाठी विकसित यंत्र आणि संबंधीत व्यवस्थेची
माहिती दिली.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी
अर्ज करण्याची मुदत २० मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा
केली आहे. ही मुदत १ मे रोजी संपणार होती. एकरकमी
कर्ज परतफेड योजनेची मुदत यापूर्वीच ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
****
औरंगाबाद महापालिकेनं कचऱ्याची
विल्हेवाट न लावणाऱ्या आठ मोठ्या हॉटेलसह २५ दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे. शंभर
किलोहून अधिक कचरा निर्माण होत असल्यास संबंधितांनी प्रक्रिया करणं बंधनकारक करण्यात
आलं आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणांसह,
रस्त्यावरच काही नागरिक कचरा टाकत असल्याचं आढळून आल्यानं अशा नागरिकांकडून दंड वसुल करण्याची सूचना महापौर
नंदकुमार घोडेले यांनी केली आहे.
****
भिलार या पुस्तकांच्या गावाचा
अभिनव प्रकल्पाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त भिलार इथं वर्षपूर्ती सोहळ्याचं
आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. या सोहळ्यासाठी
वाचनप्रेमींनी भिलारला आवर्जुन भेट द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment