आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१६ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.००
वाजता
****
जम्मू-कश्मीरमधे नगरपालिका
निवडुकांच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात श्रीनगर आणि गंदरबल या जिल्ह्यांमधे आज
कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान होत आहे. सकाळी
संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान चालू राहील. अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले
आहेत, तर काही ठिकाणी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
त्यामुळे १३२ पैकी फक्त ३६ प्रभागांमधे मतदान होत आहे.
****
जम्मू-
काश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात काल रात्री सुरक्षा दलाच्या एका तळावर झालेल्या
दहशतवादी हल्लयात केंद्रीय राखीव
पोलिस दलाचे दोन जवान जखमी झाले. नेवा
भागातल्या या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारला सुरक्षा दलानं चोख
प्रत्युत्तर दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोदंवून
तपास सुरु केला आहे.
****
‘द
कलाम व्हिजन -डेअर टू ड्रीम’ हे संरक्षण संशोधन विकास संस्था - डी आर डी ओ चं
संकेतस्थळ संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत माजी राष्ट्रपती
आणि मिसाईलमॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांना समर्पित केलं. कलाम यांच्या ८७
व्या जयंतीनिमित्त हे संकेतस्थळ सुरु करण्यात आलं असून, कृत्रिम बुध्दिमत्ता, रोबोटिक्स, स्वायत्त
प्रणाली यावर भर देण्यात आला आहे.
****
अहमदनगर इथल्या नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे
संचालक सुवालाल गुंदेचा यांचं मध्यरात्री निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. नगर अर्बन
बँकेचे अध्यक्ष आणि सलग 48 वर्ष त्यांनी संचालक म्हणून काम पाहिलं, जिल्ह्यात सहकारी
पतसंस्थांना बळ देऊन सहकार क्षेत्र उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पार्थिव
देहावर आज सायंकाळी अहमदनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं सुरू
असलेली ‘जागर आदिशक्तीचा, सन्मान नेतृत्वाचा’ ही नवरात्रोत्सव यात्रा काल उस्मानाबाद
इथं पोहचली होती. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या महिला सरपंच, नगरसेविका आणि सामाजिक
कार्यकर्त्या, यांचा महिला मोर्चाच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
*****
***
No comments:
Post a Comment