आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.००
वाजता
****
फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची हाँगकाँग मधली
२५५ कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार
प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात
नीरव मोदीची चार हजार ७४४ कोटी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे.
****
माहिती तंत्राज्ञान उद्योगानं
राष्ट्रउभारणीत हातभार लावावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी
दिल्लीत काल देशभरातल्या आयटी तसंच इलेट्रॉनिक उत्पादक उद्योजकांबरोबर त्यांनी संवाद
साधला. भारतीय कंपन्यानी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजातल्या वंचित घटकांच्या
विविध प्रश्नांचा सामना करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात
कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यामुळे त्यावर अवंलबून न राहता इलेक्ट्रीक वाहनांचा वापर
व्हायला हवा असं त्यांनी सांगितलं.
****
सेऊल
शांती पुरस्कारासाठी यंदा आपली निवड केल्याबद्दल पंतप्रधानांनी सेऊल शांती पुरस्कार
सांस्कृतिक प्रतिष्ठानाचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार तमाम भारतीयांच्या वतीनं आपण
विनम्रपणे स्वीकारत असल्याचं ट्विट पंतप्रधानांनी यांनी केलं आहे. हा पुरस्कार म्हणजे
संपूर्ण मानवजातीचं कल्याण, समृद्धी, प्रगती, आणि
शांतीसाठी नव्या भारताच्या योगदानाची पावती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
मराठा विकास मंडळाच्या वतीनं, आजपासून औरंगाबाद इथं
चार दिवसीय राज्यस्तरीय उद्योग महाएक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरात श्रीहरी
पॅव्हेलियन इथं आयोजित हा महाएक्स्पो सर्वांसाठी खुला असून, या प्रदर्शनात उद्योग क्षेत्रातील
विविध मान्यवर दररोज मार्गदर्शन करणार असल्याचं संयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
पुण्यात पिंपरी चिंचवड भागात आज सकाळी एका झोपडीत
गॅस सिलिंडरचा स्फोट होवून दोन जण ठार झाले. पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना
घडली. स्फोटामुळे लागलेल्या आगीत आजुबाजूच्या पाच झोपड्यांचंही नुकसान झाल्याचं, पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment