आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.००
वाजता
****
विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज
सर्वत्र साजरा होत आहे. वाईटावर चांगल्याचा विजय या प्रतिकात्मक स्वरुपात हा सण साजरा
केला जातो. नवरात्रोत्सवाची आज सांगता होत
आहे. या निमित्तानं आदिशक्तीची साडे तीन शक्तीपीठं म्हणजे माहूर इथं रेणुका देवी मंदीर,
तुळजापूर इथं तुळजा भवानी मंदीर, कोल्हापूर इथं अंबाबाई मंदीर, नाशिक जिल्ह्यात वणी
इथं सप्तश्रृंगी मंदीर, तसंच अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवी मंदिरात आयोजित विविध धार्मिक
अनुष्ठानांची आज सांगता होत आहे.
****
धम्मचक्र प्रवर्तन दिन आज सर्वत्र साजरा
होत आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसऱ्याच्या
दिवशी, आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर इथं बौध्द धर्माची दीक्षा घेतली होती. या अनुषंगानं,
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीनं
नागपूर इथं दीक्षा भूमीवर मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. औरंगाबाद इथं बुद्धलेणी परिसरात श्रामणेर शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
देशाच्या सीमा अधिक सुरक्षित करणं आवश्यक असल्याचं,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं,
विजयादशमी उत्सवात स्वयंसेवकांला संबोधित करत होते. भागवत यांच्याहस्ते यावेळी शस्त्रपूजन
करण्यात आलं. संरक्षण साहित्य निर्मितीतली आपली क्षमता वाढवण्याची गरज भागवत यांनी
यावेळी व्यक्त केली. अयोध्येत राममंदीर बांधण्यासाठी कायदा करावा, असं भागवत यांनी
म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे. शहरी नक्षलवादावरही त्यांनी टीका केल्याचं या बाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
ब्युनॉस एअर्स इथं युवा ऑलिंपिक स्पर्धेत
भारताच्या आकाश मलिकनं धनुर्विद्येतील पहिलं रौप्यपदक पटकावलं आहे. पंधऱा वर्षीय आकाश
हरयाणातल्या शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. भारताच्या युवा क्रीडापटूंनी या स्पर्धेत
आतापर्यंत तीन सुवर्ण, नऊ रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकत, आजवरची सर्वोकृष्ट कामगिरी
केली आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment