आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१६ ऑगस्ट २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांची आज पहिली पुण्यतिथी.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीत अटलजींच्या 'सदैव अटल' या स्मृती स्थळावर जाऊन
त्यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, डॉ.
हर्षवर्धन यांनीही अटलजींना अभिवादन केलं. या वेळी झालेल्या प्रार्थना सभेत अटलजींचे
कुटूंबीय उप.सि्थि त होते, गेल्या वर्षी १६ ऑगस्ट रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचं वयाच्या
९३ व्या वर्षी निधन झालं होतं.
****
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही माजी
पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांना कोलकत्ता इथं आदरांजली अर्पण केली. ममता बॅनर्जी
या अटल बिहारी वाजपयी पंतप्रधान असतांना त्यांच्या मंत्री मंडळात रेल्वे मंत्री होत्या,
इंसानियत, जमुरीयत आणि कश्मिरीयत या त्यांच्या तत्वांचं आपण पालन करायला हवं असं ममता
बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.
****
उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू आज पश्चिम बंगालच्या
दौऱ्यावर जात आहेत. रविंद्रनाथ टागोर यांचं शांतीनिकेतन इथलं श्यामली हे निवासस्थान
ते आज राष्ट्राला समर्प्रित करणार आहेत. त्यानंतर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या
कार्यक्रमात ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांच्या प्रतिमेचं अनावरण करणार आहेत.
****
एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकविरोधात लोकचळवळ राबवण्याचा
संकल्प केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. ब्राझील इथं
स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ते बोलत होते. यासंदर्भात राज्य सरकारांसह सर्व संबंधितांशी,
शी सल्ला मसलत करून, या अभियानाचा एक ठोस आराखडा तयार करण्यात येईल, असं ते म्हणाले.
पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पंतप्रधानांनी,
काल स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, प्लास्टिकचा वापर थांबवण्याचं आवाहन केलं आहे.
****
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आज काश्मिर प्रश्नावर
सल्लामसलत करणार आहे, केंद्र सरकारनं जम्मू काश्मिरला विशेष हक्क देणारं ३७० आणि ३५
अ हे कलम काढल्या नंतर पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे तक्रार केली
होती, काश्मिरचं ३७० कलम काढणं हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचं भारतानं म्हटलेलं
आहे.
****
No comments:
Post a Comment