आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० ऑगस्ट २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना
दिवस आज पाळण्यात येत आहे. या निमित्तानं दिल्लीत वीरभूमी या राजीव गांधी यांच्या स्मृतिस्थळावर
आज सकाळी एक प्रार्थना सभा घेण्यात आली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान
डॉ मनमोहनसिंह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि
कार्यकर्त्यांनी, राजीव गांधी यांच्या समाधीवर फुलं अर्पण करून अभिवादन केलं.
****
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष
दिवंगत सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज सहा वर्ष पूर्ण झाली.
या निमित्तानं आज सकाळी अनेक ठिकाणी दाभोलकरांना अभिवादन करण्यात आलं.
****
चांद्रयान दोन या मोहिमेअंतर्गत चंद्रयानाने आज सकाळी
साडेनऊ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख
डॉक्टर के सिवन यांनी ही माहिती दिली. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया
सुलभ व्हावी, यासाठी हे चंद्रयान चंद्राभोवती फेऱ्या मारेल, त्याचा वेग कमी करण्यासाठी
त्यातलं द्रव इंधनावर चालणारं इंजिन प्रज्वलित केलं जाणार आहे. २२ जुलै रोजी जीएसएलव्ही
मार्क थ्री एम वन या प्रक्षेपकाच्या साहाय्यानं चांद्रयान दोनच प्रक्षेपण झालं आहे.
****
स्वित्झर्लंडमधे बसील इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन
स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत, बी साई प्रणित आणि एच एस प्रणॉय यांनी दुसऱ्या
फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतनं काल पहिल्या फेरीतल्या सामन्यात आयर्लंडच्या न्हाट
गुयेनला १७-२१, २१-१६, २१-६ असं नमवलं. प्रणितनं कॅनडाच्या जॅसन अँथनी हो हवेला, तर
प्रणॉयनं फिनलँडच्या इती हेईनोला पराभूत केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment