आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ नोव्हेंबर २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात अवकाळी पावसामुळे
झालेल्या पीकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं आहे. राजभवनानं एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली
आहे. राज्य सरकारनं राज्यातील पीक नुकसानीची माहिती केंद्र सरकारला कळवली होती. शिवसेनेच्या
एका शिष्टमंडळानंही काल राज्यपाल भगतिंह कोश्यारी यांची भेट घेऊन नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील
मागणी केली होती.
****
भाजप आणि शिवसेनेदरम्यान
राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून शिवसेनेचा मुख्यमंत्री
होईल, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत
होते. शिवसेनेनं ठरवलं तर पक्षाला राज्यात स्थीर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ
प्राप्त करता येईल, असंही राऊत यावेळी म्हणाले. भाजपला सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेनं
कोणताही अंतिम इशारा दिलेला नसल्याची माहिती खासदार राऊत यांनी यावेळी दिली.
****
कर्जत लोणावळा घाटात मंकीहिल इथं सुरू असलेल्या रेल्वेमार्गाच्या
दुरुस्तीमुळे मिरज ते कोल्हापूर मार्गे मुंबई धावणारी कोयना एक्सप्रेस आणि मिरज मार्गे
जाणारी हुबळी ते कुरला मुंबई या दोन रेल्वे पुण्यापर्यंतच धावणार आहेत. एक महिनाभर
या दोन्ही रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
****
यंदाच्या पावसामुळं सांगली जिल्ह्यातले चोवीस तलाव शंभर टक्के भरले आहेत. ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव
दहा वर्षानंतर पूर्ण क्षमतेनं भरला आहे. सांगली जिल्ह्यातल्या पाच मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये एकूण ७९९ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे.
****
कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर काल रात्रीत झालेल्या अपघात दोन दुचाकीस्वार मृत्यूमुखी
पडले. मोटार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातील मृत कन्नडचे रहिवासी असून प्रल्हाद
राठोड आणि रवींद्र राठोड अशी त्यांची नावं आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment