Thursday, 3 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.10.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०३ ऑक्टोबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 वंदे भारत श्रेणीतल्या नवी दिल्ली ते कटरा रेल्वेगाडीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वेमंत्री पियुष गोयल, पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जीतेंद्रसिंह, आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी सुरू झालेल्या या रेल्वेमुळे दिल्ली ते कटरा हा प्रवास बारा तासांऐवजी, आठ तासांचा झाला आहे. परवा पाच तारखेपासून ही गाडी सर्वसामान्यांसाठी सुरु होणार असून त्यासाठीचं आरक्षण खुलं करण्यात आलं आहे. मंगळवार वगळता आठवडयाच्या सर्व दिवशी ही गाडी धावणार आहे.
****

 भारतीय जनता पक्षानं १४ उमेदवारांची, काँग्रेसनं २० उमेदवारांची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल ७७ उमेदवारांची तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ४५ उमेदवारांची यादी काल जाहीर केली.

 भाजपनं आपल्या दुसऱ्या यादीत केज मतदारसंघातून नमिता मुंदडा, लातूर शहर - शैलेश लाहोटी, तर उदगीर विधानसभा मतदारसंघातून अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली आहे.

 काँग्रेसनंच्या दुसऱ्या यादीत औरंगाबाद पश्चिम मधून रमेश गायकवाड, सिल्लोड - प्रभाकर पालोदकर, तर परभणी मधून रविराज अशोकराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नांदेड जिल्ह्यातल्या किनवट मतदारसंघातून प्रदीप नाईक, जिंतूर - विजय भांबळे, घनसावंगी - राजेश टोपे, गेवराई - विजयसिंह पंडित, माजलगाव - प्रकाश सोळंके, बीड - संदीप क्षीरसागर, केज - पृथ्वीराज साठे, तर परळीतून - धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.

 दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपते आहे, या पार्श्वभूमीवर आज अनेक उमेदवार विविध मतदार संघातून अर्ज भरण्याची शक्यता आहे.

 शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज मुंबईतल्या वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...