Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –03 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी
६.००
****
विधानसभा
निवडणुकीसाठी आज विविध ठिकाणी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना नेते आदित्य
ठाकरे यांनी आज वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापूर मधून महायुतीचे
दिलीप माने, महाआघाडीच्या प्रणिती शिंदे, उत्तर सोलापूर मधून महायुतीचे विजय देशमुख,
दक्षिण सोलापूरमधून महायुतीचे सुभाष देशमुख, पंढरपूर इथून राष्ट्रवादीचे भारत भालके
तसंच शिवसेनेच्या बंडखोर शैला बोरसे, कराड उत्तर मतदार संघातून महाआघाडीचे पृथ्वीराज
चव्हाण तर महायुतीचे डॉ अतुल भोसले, अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी मतदार संघातून महायुतीचे
शिवाजी कर्डिले, अकोले मतदारसंघातून महायुतीचे वैभव पिचड, कर्जत जामखेड मधून महाआघाडीचे
रोहित पवार, सातारा विधानसभा मतदार संघातून महाआघाडीचे दीपक पवार, सांगलीतून महायुतीचे
सुरेश खाडे, जळगाव जिल्ह्यातल्या रावेर मतदार संघातून काँग्रेसचे शिरीष चौधरी तर जामनेर
मतदार संघातून महायुतीचे गिरीश महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
परळीतून
महायुतीच्या पंकजा मुंडे तसंच महाआघाडीचे धनंजय मुंडे, बीडमधून महायुतीचे जयदत्त क्षीरसागर,
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर मतदार संघातून महायुतीचे बापूसाहेब गोरठेकर, लातूर शहर मतदार
संघातून महाआघाडीचे अमित देशमुख तर लातूर ग्रामीणमधून महाआघाडीचे धीरज देशमुख, नांदेड
जिल्ह्यातल्या हदगाव मतदार संघातून महायुतीचे नागेश पाटील आष्टीकर, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
उमरगा मतदार संघातून महायुतीचे ज्ञानराज चौगुले, हिंगोली जिल्ह्यात वसमतमधून महायुतीचे
जयप्रकाश मुंदडा, तर कळमनुरीतून महायुतीचे संतोष बांगर, उस्मानाबादमधून वंचित बहुजन
आघाडीचे धनंजय शिंगाडे, औरंगाबाद पूर्व मतदार संघातून महायुतीचे अतुल सावे आणि एमआयएमचे
अब्दुल गफ्फार कादरी, फुलंब्री मतदार संघातून महायुतीचे हरिभाऊ बागडे तर महाआघाडीचे
कल्याण काळे, औरंगाबाद मध्य मतदार संघातून भाकपचे अभय टाकसाळ, एमआयएमचे नासेर सिद्धिकी,
औरंगाबाद पश्चिममधून महायुतीचे संजय शिरसाट तर वैजापूर मधून महायुतीचे विजय बोरनारे
यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
लोकसभेच्या
सातारा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे श्रीनिवास पाटील
यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
उमेदवारी
अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप पक्षाकडून उमेदवारी
जाहीर न झालेले इच्छूक तसंच त्यांच्या समर्थकांमध्ये आज नाराजीचं वातावरण दिसून आलं.
भारतीय
जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार नाही, असं माजी मंत्री एकनाथ
खडसे यांनी सांगितलं आहे. ते आज जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर इथं कार्यकर्त्यांशी बोलत
होते. पक्ष जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
****
राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि काँग्रेसचे माजी आमदार
नितेश राणे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कोकणातील कणकवली मतदार संघातून
ते विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
अमळनेर
इथल्या काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस विधिज्ञ ललिता पाटील आणि युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समितीचे
अध्यक्ष पराग पाटील यांनी जामनेर इथं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
****
दुष्काळ,
शेतकरी आत्महत्या असे अनेक मुद्द आहेत ज्यावर सत्ताधारी उत्तर देऊ शकत नाहीत, असं राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज ठाणे इथं पत्रकार परिषदेत
बोलत होते. राज्यातलं वातावरण पाहता परिवर्तन होईल, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं.
लोक ज्यावेळी नाराज असतात तेव्हाच कलम ३७० आणि राम मंदिरासारखे भावनिक मुद्दे उचलले
जातात, अशी टीका पवार यांनी केली. मुख्यमंत्र्यांविरोधात दाखल गुन्ह्यांचं प्रकरण न्यायप्रविष्ट
आहे, मात्र स्वत: मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती द्यायला हवी होती, असं ते म्हणाले.
****
काँग्रेस
पक्षाने नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव मतदार संघातून माधव पाटील जवळगावकर आणि नांदेड
दक्षिण मतदार संघातून मोहन हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मोहन हंबर्डे यांनी
आज राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
****
आमदार
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी आज २५ उमेदवारांची
यादी जाहीर केली.
****
No comments:
Post a Comment