आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि
काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेसंदर्भात
काही निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात २१ ऑक्टोबरला निवडणुका होऊन उद्या
एक महिना पूर्ण होईल, मात्र राज्यात नवीन सरकार स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.
दरम्यान, काँग्रेसच्या
हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची काल बैठक घेऊन
महाराष्ट्र सत्ता स्थापनेबाबत चर्चा केल्याचं वृत्त आहे. या बैठकीला ज्येष्ठ नेते अहमद
पटेल, मल्लिकार्जुन खरगे, ए के अँटोनी आणि के सी वेणुगोपाल हे मान्यवर उपस्थित होते,
असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर मार्गावरून जाणाऱ्या विकाराबाद
ते परळी रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली असून, लवकरच हे काम
मार्गी लागणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी
दिली. मल्ल्या यांनी काल उदगीर रेल्वे स्थानकास भेट देऊन विकास कामांची पाहणी केली,
त्यावेळी ते बोलत होते. हैदराबाद मच्छलिपट्टणम रेल्वे लवकरच परळीपर्यंत विस्तारित करण्यात
येणार असल्याचं ते म्हणाले.
****
जानेवारी २०२० मध्ये उस्मानाबाद
इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रचार सर्वदूर व्हावा यासाठी सॉफ्टवेअर
अभियंता प्रथमेश तुगावकर या तरुणाने पुणे ते उस्मानाबाद, सायकल फेरीला आज पुणे इथून
सुरुवात केली. साहित्य संमेलनाचा प्रचार आणि प्रसिध्दी त्यासोबतच तरुणांमध्ये सायकलविषयी
आस्था वाढावी याकरता हा उपक्रम राबवला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
वाशिम इथल्या नवोदित लेखिका
आणि कवयित्री धम्मज्योती कांबळे यांचं काल अकोला इथं वयाच्या 35 व्या वर्षी अल्पशा
आजाराने निधन झालं. त्यांची 'करपलेले कोंब 'ही कादंबरी प्रसिध्द असून, पूर्वीचाच श्वास
हा कवितासंग्रहही बहुचर्चित आहे.

*****
No comments:
Post a Comment