Sunday, 15 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 15.12.2019 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 १५ डिसेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता

****

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सरकारच्या वतीनं चहापानाचा कार्यक्रम तर संध्याकाळी विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांची बैठक होत आहे. या अधिवेशनात अवकाळी ग्रस्त शेतक-यांची कर्जमाफी, प्रकल्प स्थगिती असे मुद्दे मांडले जाणार आहेत. अधिवेशानात तारांकित प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. अशा प्रकारचं हे पहिलेच अधिवेशन असणार आहे.

****

आखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटऩेचे नेते आणि माजी आमदार शिवाजीराव दत्तात्रय पाटील यांचं आज पहाटे सांगली जिल्ह्यातल्या कामेरी इथं निधन झाले, ते ९० वर्षांचे होते. प्राथमिक शिक्षकांचे नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. दोन वेळा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. शिवाजीराव पाटील यांनी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले.

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातल्या कथित भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. या मागणीचं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन संघटनेनं, प्रशासनाकडे सादर केलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या लायन्स क्लब ऑफ चिकलठाणाच्या वतीनं पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीरात काल पहिल्याच दिवशी एकोणऐंशी रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सतरा डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या शिबीरात, चेहरा आणि कान विकृती तसंच भाजलेल्या व्रणांच्या ५१५ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

****

अमरावती विभागात शासकीय कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून सुमारे चार लाख ९८९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. भारतीय कापुस महामंडाऴ `सीसीआय`च्या माध्यमातून सर्वाधिक कापूस खरेदी होत आहे. पणन महामंडळाच्या दोन हजार चारशे सत्तेचाळीस खरेदी केंद्रांवर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दरानं ही कापूस खरेदी केली जात आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज चेन्नई इथं खेळला जाणार आहे. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्यात आलं आहे.

****




No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...